Join us  

कुकरच्या एक शिट्टीमध्ये करा मोत्याच्या दाण्यासारखा नायलॉन साबुदाणा, वर्षभर टिकतील, दुप्पट फुलतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2023 12:46 PM

How to Make Nylon Sago in Cooker उपवासाला साबुदाणा भिजवायला वेळ नाही? वर्षभर टिकणारे करा नायलॉन साबुदाणा

उपवास असो किंवा नसो, अनेकांना साबुदाण्याचे पदार्थ फार आवडतात. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा, साबुदाण्याची खीर असे अनेक पदार्थ उपवासाला केले जातात. साबुदाणा योग्यरित्या भिजला तरच हे पदार्थ उत्तम बनतात. काही वेळेला साबुदाणा लवकर भिजत नाही, किंवा साबुदाणा भिजत ठेवण्यासाठी वेळ मिळत नाही.

अशा परिस्थितीत आपण नायलॉन साबुदाण्याचा चिवडा बनवून खाऊ शकता. हा चिवडा काही मिनिटात झटपट बनतो. विकतचे नायलॉन साबुदाणा आणण्यापेक्षा आपण घरी देखील नायलॉन साबुदाणा बनवू शकता. कुकरच्या एक शिट्टीमध्ये हा पदार्थ बनतो. व वर्षभर टिकतो. तळल्यानंतर नायलॉन साबुदाणा दुपट्टीने फुलतो. चला तर मग या झटपट पदार्थाची कृती पाहूयात(How to Make Nylon Sago in Cooker).

नायलॉन साबुदाणा बनवण्यासाठी लागणारं साहित्य

साबुदाणा

पाणी

मीठ

आंबट - गोड चवीचं करा थंडगार कोकम सरबत, कमी वेळात - झटपट सरबत रेडी..

अशा पद्धतीने करा नायलॉन साबुदाणा

सर्वप्रथम, एक वाटी साबुदाणा एका मोठ्या भांड्यात भिजत ठेवा. भिजवण्यापूर्वी साबुदाणा २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुवा. व रात्रभर किंवा ८ तासांसाठी भिजत ठेवा. ८ तास झाल्यानंतर चमच्याच्या मदतीने किंवा हाताने साबुदाणा मोकळा करा. साबुदाणा मोकळा केल्यानंतर त्यात एक वाटी गरम पाणी घालून मिक्स करा. व त्यावर झाकण ठेऊन रात्रभर किंवा ८ तासांसाठी भिजत ठेवा.

८ तास झाल्यानंतर चमच्याने साबुदाणा मोकळा करा. व कुकरमध्ये घालून चमच्याने मॅश करा.  साबुदाणा मॅश केल्यानंतर त्यात एक वाटी साधं थंड पाणी घालून मिश्रण मिक्स करा. व चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्र करा. चमच्याने सतत मॅश करत राहा. त्यात साबुदाण्याचे गुठळ्या तयार होणार नाही काळजी घ्या.

आता कुकरचं झाकण लावा. व लो मिडीयम फ्लेमवर एक शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करा. अर्धवट कुकर गरम असतानाच कुकरचं झाकण खोलायचे आहे. व साबुदाण्याचं मिश्रण चमच्याने मिक्स करायचे आहे. आता एक पायपिंग बॅग घ्या, त्यात साबुदाण्याचे तयार मिश्रण भरून छोटे - छोटे नायलॉन एका प्लास्टिकच्या पेपरवर पाडून घ्या. व २ ते ३ दिवसांसाठी कडकडीत उन्हामध्ये सुकवून घ्या.

पाच-दहा किलो कांदे एकदम विकत आणले पण सडले तर? लक्षात ठेवा ४ टिप्स, लवकर सडणार नाहीत

अशा प्रकारे नायलॉन साबुदाणा रेडी झालेला आहे. आपण हा साबुदाणा हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता. व हवे तेव्हा तेलात तळून याचा आस्वाद घेऊ शकता.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स