संध्याकाळी थोडीशी भूक लागतेच. यावेळी आपल्याला खूप काही हेवी खायचं नसतं. पण तरीही तोंडात काहीतरी चटपटीत, चवदार टाकावं असं वाटतं. घरात लहान मुलं, वयस्कर व्यक्ती असतील तर त्यांनाही त्यावेळेला काहीतरी खायला हवंच असतं. ते खाणं पौष्टिक असलं तर मग अधिकच उत्तम.. म्हणूनच त्या वेळेसाठी खायला काय द्यावं हा प्रश्न तुम्हाला पडत असेल तर सरळ प्लेन ओट्स घ्या आणि त्याची चटपटीत भेळ करा..(how to make oats bhel?) हा पदार्थ एवढा चवदार होईल की लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरातले सगळेच अगदी आवडीने फस्त करतील (tasty oats chaat recipe). बघा ओट्सची चटपटीत भेळ करण्याची सोपी रेसिपी...(oats bhel recipe)
ओट्सची भेळ करण्याची रेसिपी
१ वाटी प्लेन ओट्स
१ वाटी मखाना
१ वाटी मुरमुरे
१ वाटी फरसान
१ मध्यम आकाराचा कांदा
२ मध्यम आकाराचे टोमॅटो
३ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर
काकडी, सिमला मिरची, पत्ताकोबी या भाज्या मिळून अर्धी वाटी
चवीनुसार तिखट, मीठ आणि १ टीस्पून चाट मसाला
कृती
सगळ्यात आधी तर ओट्स कढईमध्ये टाकून मंद आचेवर भाजून घ्या. त्यानंतर ते एका भांड्यात काढून घ्या आणि त्यामध्येच मग मखाना टाकून भाजून घ्या...
वाढलेलं वजन भराभर कमी करणारी ‘ही’ ५ पेयं, वजनाचा काटा सरसर उतरेल-पाहा यादी
आता भाजून घेतलेले ओट्स आणि मखाना थंड झाले की ते एका मोठ्या भांड्यात काढा. त्यामध्ये मुरमुरे, फरसाण, कोथिंबीर, तुमच्या आवडीच्या बारीक चिरलेल्या इतर भाज्या असं सगळं टाका.
त्यावर चवीनुसार मीठ, लाल तिखट आणि चाट मसाला घाला आणि सगळे पदार्थ एकदा व्यवस्थित हलवून घ्या. चटपटीत मखाना भेळ झाली तयार.
जर तुमच्याकडे खूप कमी वेळ असेल तर अशी भेळ तुम्ही करू शकता. जर थोडा जास्त वेळ असेल तर या भेळमध्येच उकडलेले बटाटे, सुक्या पुऱ्या, चिंच- पुदिना चटणी घालून तिला अधिक चवदार करू शकता.