Lokmat Sakhi >Food > फक्त १५ मिनिटांत करा मऊ- लुसलुशीत ओट्स इडली; डाळ- तांदूळ भिजविण्याची कटकटच नाही 

फक्त १५ मिनिटांत करा मऊ- लुसलुशीत ओट्स इडली; डाळ- तांदूळ भिजविण्याची कटकटच नाही 

How To Make Oats Idli: नाश्त्यासाठी हा एकदम परफेक्ट मेन्यू एकदा करून बघाच. वेटलॉस करणाऱ्यांसाठी हा पदार्थ उत्तम आहे. (Oats idli recipe in marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2024 03:28 PM2024-02-10T15:28:32+5:302024-02-10T15:29:14+5:30

How To Make Oats Idli: नाश्त्यासाठी हा एकदम परफेक्ट मेन्यू एकदा करून बघाच. वेटलॉस करणाऱ्यांसाठी हा पदार्थ उत्तम आहे. (Oats idli recipe in marathi)

How to make oats idli, Oats idli in just 15 minutes, Oats idli recipe in marathi, Easy breakfast recipe, Healthy tiffin options for kids | फक्त १५ मिनिटांत करा मऊ- लुसलुशीत ओट्स इडली; डाळ- तांदूळ भिजविण्याची कटकटच नाही 

फक्त १५ मिनिटांत करा मऊ- लुसलुशीत ओट्स इडली; डाळ- तांदूळ भिजविण्याची कटकटच नाही 

Highlightsमधुमेह, वाढतं वजन यामुळे अनेक लोक तांदूळ खाणं टाळतात. त्यांची इडली खाण्याची हौस ही ओट्स इडली नक्कीच भागवू शकते. 

बऱ्याचदा असं होतं की आपल्याला नाश्त्यासाठी इडली करायची असते, पण नेमकं इडलीसाठी डाळ- तांदूळ भिजत घालायला आणि नंतर ते वाटत बसायला वेळच नसतो. विकत मिळणारं इडलीचं पीठ आणायचं म्हटलं तरी बऱ्याचदा घराबाहेर पडण्याचा कंटाळा आलेला असतो. शिवाय बऱ्याचदा तीच ती डाळ- तांदळाची इडली खाण्याचा कंटाळाही येतो. म्हणूनच अशावेळी वेगळ्या चवीची इडली खाण्याची इच्छा झाली तर ही एक रेसिपी तुम्हाला माहिती असू द्या. अवघ्या काही मिनिटांत ओट्स इडली (oats idli) कशी करायची ते पाहून घ्या (Oats idli in just 15 minutes). मुलांना डब्यात देण्यासाठी, नाश्त्यासाठी तसेच सायंकाळी स्नॅक्स म्हणून हा पदार्थ उत्तम आहे (Healthy tiffin options for kids). जे लोक वेटलॉस (weight loss) करत आहेत, त्यांच्यासाठी तर हा पदार्थ परफेक्ट आहे. (Easy breakfast recipe)

 

ओट्स इडली करण्याची रेसिपी

साहित्य

अर्धा कप ओट्स

अर्धा कप रवा

तळहात रखरखीत झाले- हाताची बोटेही काळवंडली? १ घरगुती उपाय, तळहात होतील स्वच्छ- मुलायम

अर्धा कप दही

अर्धा टीस्पून बेकिंग सोडा 

चवीनुसार मीठ

 

कृती 

सगळ्यात आधी तर ओट्स कढईमध्ये थोडेसे भाजून घ्या. ओट्स थंड झाले की ते मिक्सरमधून फिरवून घ्या आणि त्याची बारीक पावडर करा.

हे ओट्सचे पीठ एका भांड्यात काढा. त्यात रवा, चवीनुसार मीठ आणि दही घाला. यानंतर थोडं थोडं पाणी घालून पीठ भिजवून घ्या.

Teddy Day 2024: बॉलीवूड सेलिब्रिटींचं टेडी लव्ह, बघा कोणत्या टेडीमध्ये आहे कुणाची 'जान'

आपण नेहमीच्या इडलीला जसं पीठ भिजवतो, साधारण तसंच हे पीठ असावं. पीठ भिजवून झालं की सगळ्यात शेवटी त्यात बेकिंग सोडा घाला. पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवून घ्या आणि १० मिनिटांसाठी झाकून ठेवा.

त्यानंतर नेहमीप्रमाणे इडलीपात्रात इडल्या लावा. अवघ्या काही मिनिटांतच अगदी मऊसूत, टम्म फुगलेल्या, लुसलुशीत इडल्या तयार...

मधुमेह, वाढतं वजन यामुळे अनेक लोक तांदूळ खाणं टाळतात. त्यांची इडली खाण्याची हौस ही ओट्स इडली नक्कीच भागवू शकते. 

 

Web Title: How to make oats idli, Oats idli in just 15 minutes, Oats idli recipe in marathi, Easy breakfast recipe, Healthy tiffin options for kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.