Join us  

एक थेंबही तेल न वापरता घरच्याघरी करा फ्रायम्स आणि बॉबी! न तळता खा मस्त कुरकुरीत पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2023 4:10 PM

Tips To Fry Fryums Without Oil, Know 3 Tricks : फ्रायम्स -पापड तळायचे तर तेल हवं आणि तेलकट तर खायचं नाही, मग त्यावर उपाय काय?

आपल्या भारतीय जेवणामध्ये तोंडी लावण्यासाठी म्हणून अनेक पदार्थ असतात. या पदार्थांमध्ये लोणचं, पापड, कुरडया, फ्रायम्स, चटण्या अशा वेगवेगळ्या पदार्थांचा समावेश असतो. जेवताना जेवणासोबत तोंडी लावायला म्हणून काहीतरी कुरकुरीत खायचे असल्यास आपण पापड, कुरडया आणि फ्रायम्स यांना प्राधान्य देतोच. आपल्याकडील प्रत्येक घरात दर उन्हाळ्यात पापड, लोणची, कुरडया, सांडगे, फ्रायम्स असे पदार्थ बनवून वर्षभरासाठी साठवले जातात. फ्रायम्सचं नाव ऐकताच प्रत्येकाला, हा पदार्थ खाण्याची इच्छा होते. पापड, कुरडया, फ्रायम्स हे पदार्थ तेलात तळून काढल्यावर अगदी चौपट फुलून कुरकुरीत होतात. असे फुलून आलेले फ्रायम्स खाण्यास सगळ्यांनाच आवडतात. 

पापड, फ्रायम्स असे कुरकुरीत पदार्थ खायला जरी आवडत असले तरीही ते तेलात तळलेले असल्याकारणाने ते बरेच तेल शोषून घेते. जास्तीचे तेल शोषून घेतल्याने हे फ्रायम्स, पापड खाणे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने हानिकारक असते. परंतु काही सोप्या ट्रिक्स वापरून आपण हे फ्रायम्स तेलाचा वापर न करता देखील तितकेच कुरकुरीत व क्रिस्पी बनवू शकतो. या काही सोप्या ट्रिक्स वापरून फ्रायम्स चौपट तर फुलतील शिवाय तेलाचा वापर न केल्यामुळे ते खाणे शरीरासाठी हानिकारक देखील ठरणार नाही(How To Make Oil Free Fryums Recipes That You Can Make At Home).

तेलाचा वापर न करता फ्रायम्स व पापड भाजून घेण्याच्या सोप्या पद्धती :- 

१. फ्रायम्स भाजून घ्यावेत :- फ्रायम्स चौपट फुलून येण्यासाठी आपण मिठाचा वापर देखील करू शकतो. एका मोठ्या कढईत वाटीभर मीठ ओतून घ्यावे. हे मीठ गॅसच्या मंद आचेवर हलकेच गरम करून घ्यावे. मीठ व्यवस्थित गरम झाल्यावर त्यात फ्रायम्स फुलण्यासाठी घाला. चमच्याच्या मदतीने हे फ्रायम्स फुलेपर्यंत ढवळत राहा. यामुळे मीठ गरम होऊन त्याच्या वाफेमुळे फ्रायम्स फुलून तयार होतात. आपण हे फ्रायम्स भाजून प्लास्टिकच्या पिशवीत किंवा डब्यात साठवून ठेऊ शकता.

उडपीस्टाइल परफेक्ट डोसा होण्यासाठी पिठात घाला १ गोष्ट, युक्ती छोटी पण डोसा भारी...

२. मायक्रोवेव्हमध्ये फ्रायम्स भाजून घ्यावेत :- सर्वप्रथम, मायक्रोवेव्ह प्लेट घ्या, त्यात फ्रायम्स अंतर ठेऊन सुटसुटीत ठेवा. आता ही प्लेट मायक्रोवेव्हमध्ये ठेवा आणि ३० सेकंदावर सेट करा. त्यानंतर एकदा बाहेर काढा आणि पुन्हा ३० सेकंद मायक्रोवेव्हमध्ये ठेवा. अशाप्रकारे तेलाचा वापर न करता, कुरकुरीत आणि स्वादिष्ट फ्रायम्स खाण्यासाठी तयार आहेत. 

मस्त- खमंग- खुसखुशीत धपाटे एकदा खाऊन तर पहा! मराठवाड्याची खास पारंपरिक डिश, शाळेच्या डब्यासाठी परफेक्ट...

उरलेल्या इडलीची करा चिली इडली, पदार्थ देशी - चव चटपटीत चायनीज...

३. एअर फ्रायर मध्ये फ्रायम्स करण्यासाठी :- एअर फ्रायरमध्ये फ्रायम्स तळण्यासाठी, सर्वप्रथम त्याच्या बॉक्समध्ये थोडेसे फ्रायम्स ठेवा. फ्रायम्सवर हलक्या हाताने ब्रशने तेल लावा. जास्त तेल लावू नये. यानंतर फ्रायम्स एअर फ्रायरमध्ये २ मिनिटे ठेवा. अशा प्रकारे फुगलेले आणि कुरकुरीत फ्रायम्स खाण्यासाठी तयार होतील.

टॅग्स :अन्न