Lokmat Sakhi >Food > फक्त ५ मिनिटांत करा कांद्याची चटणी, पावसाळ्यात कच्चा कांदा नको- खा अशी मस्त चमचमीत चटणी

फक्त ५ मिनिटांत करा कांद्याची चटणी, पावसाळ्यात कच्चा कांदा नको- खा अशी मस्त चमचमीत चटणी

Onion Chutney Recipe : How To Make Onion Chutney At Home : तोंडी लावण्यासाठी करा खास पदार्थ, तोंडाला येईल चव...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 06:18 PM2024-07-11T18:18:44+5:302024-07-11T18:27:51+5:30

Onion Chutney Recipe : How To Make Onion Chutney At Home : तोंडी लावण्यासाठी करा खास पदार्थ, तोंडाला येईल चव...

How To Make Onion Chutney At Home Onion Chutney Recipe | फक्त ५ मिनिटांत करा कांद्याची चटणी, पावसाळ्यात कच्चा कांदा नको- खा अशी मस्त चमचमीत चटणी

फक्त ५ मिनिटांत करा कांद्याची चटणी, पावसाळ्यात कच्चा कांदा नको- खा अशी मस्त चमचमीत चटणी

जेवणाच्या ताटातील काही पदार्थ हे जेवणाची चव वाढवतात. आपल्या ताटात तोंडी लावायला लोणचं, चटणी, कांदा असे अनेक पदार्थ असतात. काहींना जेवताना कांदा खाण्याची सवय असते. जेवताना तोंडी लावायला कांदा हा लागतोच. जेवणासोबत चटकदार, तिखट, कुरकुरीत कांदा तोंडी लावला की जेवणाची चव अधिकच छान लागते. कांद्याशिवाय आपला स्वयंपाक पूर्ण होऊच शकत नाही. काही पदार्थ असे असतात की त्यासोबत तोंडी लावण्यासाठी म्हणून कच्चा कांदा हा लागतोच(Kachhya Kandyachi Chatni)

आपण बऱ्याचदा जेवणात तोंडी लावायला कांद्याच्या उभ्या किंवा गोल गोल फोडी करतो. त्यांना लिंबू - मीठ लावतो. हे चवदार लागतेच. परंतु जेवणात अशाप्रकारे नुसताच कांदा खाण्यापेक्षा तोंडी लावण्यासाठी म्हणून काहीतरी चटपटीत करता येऊ शकते. आपण अगदी २ मिनिटांतच या साध्या कांद्याला फोडणी देऊन कांद्याची चटपटीत चटणी बनवू शकतो. अशी चटपटीत कांद्याची चटणी समोर आली की खाणारेही खुश होऊन जातील. कांद्याची चटणी कशी बनवावी याची सोपी रेसिपी पाहूयात(How To Make Onion Chutney At Home). 

साहित्य :- 

१. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)
२. मीठ - चवीनुसार 
३. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून 
४. भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट - १/२ कप 
५. कोथिंबीर - २ टेबलस्पून 
६. हिंग - चिमूटभर 
७. कडकडीत गरम तेल - २ टेबलस्पून  

घरच्याघरी तयार करा ढोकळा प्रिमिक्स, विकतसारखा सॉफ्ट -  स्पॉंजी ढोकळा करा अगदी १० मिनिटांत...

फ्रिज अगदी खच्चून भरला आहे ? रिकामी जागाच नाही, फ्रिज ऑर्गनाईझ करण्याची सोपी पद्धत... 
 

कृती :- 

१. एका  मोठ्या बाऊलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यात मीठ, लाल तिखट मसाला, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर घालावे. 
२. आता एका छोट्याशा भांड्यात तेल घेऊन ते अगदी व्यवस्थित गरम करून घ्यावे. 
३. या कडकडीत गरम तेलात चिमूटभर हिंग घालून खमंग अशी फोडणी तयार करावी.  
४. ही खमंग गरम फोडणी चिरलेल्या कांद्यावर ओतावी. चमच्याने सगळे जिन्नस व्यवस्थित हलवून एकत्रित करून घ्यावे. 

नुसताच कांदा तोंडी लावण्यापेक्षा आपण अगदी २ मिनिटांत तयार करता येणारी कांद्याची चटणी लगेच बनवू शकतो. काहीवेळा आपल्याला रोजच्या त्याच त्या भाज्य खाऊन कंटाळा येतो तेव्हा अशावेळी आपण चपाती किंवा भाकरी सोबत ही कांद्याची चटणी खाऊ शकतो.

Web Title: How To Make Onion Chutney At Home Onion Chutney Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.