बऱ्याचदा असं होतं की आपण भाज्या घ्यायला विसरतो. किंवा काही कारणांमुळे भाजीच घेणं होत नाही. अशावेळी मग स्वयंपाकाला काय करायचं असा प्रश्न पडतोच. अशावेळी मग आपण सरळ वरण किंवा पिठलं अस पर्याय निवडतो. पण असं तेच ते खाण्याचाही कंटाळा येतो. म्हणूनच ही एक रेसिपी पाहून ठेवा (red onion chutney recipe by celebrity chef Kunal Kapoor). या रेसिपीसाठी कांदा आणि ४ ते ५ लसूण पाकळ्या याव्यतिरिक्त अन्य कोणत्याही भाजीची गरज नाही (Easy and instant recipe of onion chutney ). शिवाय खूप कमी वेळेत ही चटणी होते आणि अतिशय चवदार लागते (How to make onion chutney?). बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर यांनी सांगितलेली ही खास रेसिपी.
कांद्याची चटणी करण्याची रेसिपी
साहित्य
१ मोठ्या आकाराचा कांदा
१ टीस्पून तिखट
४ ते ६ लसूण पाकळ्या
धने, जीरे आणि बडिशेप प्रत्येकी १- १ टिस्पून
फोडणीसाठी तेल
१ टेबल उडीद डाळ आणि १ टेबलस्पून चना डाळ
१ टीस्पून मोहरी
चवीनुसार मीठ
कडिपत्त्याची ७ ते ८ पाने
१ टीस्पून गूळ
चिंचेचा कोळ ३ टेबलस्पून
कृती
सगळ्यात आणी तर कांदा उभा चिरून घ्या.
यानंतर एक कढई गॅसवर गरम करायला ठेवा. तेल तापलं की त्यात तेल टाका.
भर उन्हाळ्यातही घर वाटेल थंड- हिरवंगार, 'हे' ५ इनडोअर प्लांट्स घरात ठेवा- घराचा लूक बदलेल
तेल गरम झाल्यानंतर चणा डाळ, उडीद डाळ, धने, जीरे, बडिशेप टाकून परतून घ्या.
डाळी चांगल्या परतून झाल्यानंतर त्यात कांदा टाकून परतून घ्या. कांदा परतून झाला की चिंचेचा कोळ, मीठ आणि लाल तिखट टाका. पुन्हा एकदा सगळं मिश्रण हलवून घ्या आणि एखादा मिनिट तसंच राहू द्या. यानंतर गॅस बंद करा.
आता हे मिश्रण थंड झालं की मिक्सरमध्ये टाकून ते चांगलं बारीक करून घ्या.
पुन्हा एकदा कढई गॅसवर गरम करायला ठेवा. कढई तापली की त्यात तेल, मोहरी, हिंग, लसूण आणि कढीपत्ता टाकून फोडणी करून घ्या.
संशोधनानुसार पुरुषांपेक्षा महिलांना जास्त झोपेची गरज! रोजच अपुरी झोप घेतल्यास ३ आजारांचा धोका
फोडणी छान तडतडली की मिक्सरमधून वाटलेलं कांद्याचं वाटण त्यात टाका. थोडा गूळ घाला आणि सगळं मिश्रण छान परतून घ्या.
एखादा मिनिट परतून घेतलं की ही झाली आपली झणझणीत- चटकदार अशी कांदा चटणी तयार.