पराठा हा असा पदार्थ आहे की जो आपल्यात सगळं काही सामावून घेतो. आपण वेगवेगळ्या प्रकारचे पराठे नाश्त्याला किंवा जेवणाला बनवतो. हे गरमागरम पराठे नारळाच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत खाण्यासाठी चांगले लागतात. आतापर्यंत आपण नाश्त्याला आलू पराठा, मेथी पराठा, पालक पराठा असे अनेक पराठ्यांचे प्रकार आपण खातो. काहीवेळा घरी काही भाजी नसली किंवा काही वेगळं खावंसं वाटलं तर आपण झटपट बनून तयार होणारा पराठा लगेच बनवतो.
काही पराठयांचें प्रकार असे असतात की जे बघताच आपल्या तोंडाला पाणी सुटत. चपाती सारखे गव्हाचे कणिक मळून त्याच्या आत आपल्याला हवे तसे भाज्यांचे स्टफिंग भरून पौष्टिक पराठा बनवता येतो. काहीवेळा घरातील लहान मुलं काही ठराविक भाज्या खाण्यास नकार देतात किंवा घरातील कोणत्या व्यक्तीची जर कोणती नावडती भाजी त्यांच्या नकळत त्यांच्या पोटात जाऊ द्यायची असल्यास पराठा हा एकमेव उत्तम पर्याय आहे. हे पराठे आपण लहान मुलांना सकाळच्या नाश्त्याला किंवा टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो. पराठ्यांचे अनेक प्रकार तर आतपर्यंत आपण चवीने खाल्लेच असतील परंतु आता चटकन होणारा कांद्याचा पराठा कसा बनवायचा त्याचे साहित्य व कृती लक्षात घेऊयात(How To Make Onion Paratha Recipe : Pyaaz Ka Paratha Recipe).
साहित्य :-
१. कांदे - ४ (उभे चिरून घेतलेले)
२. तेल - २ ते ३ चमचे
३. जिरे - १ टेबलस्पून
४. मोहरी - १ टेबलस्पून
५. धणे - १ टेबलस्पून
६. हिरवी मिरची - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
७ . हिंग - चिमूटभर
८. आलं - १ टेबलस्पून (बारीक किसून घेतलेलं)
९. बडीशेप - १ टेबलस्पून
१०. मीठ - चवीनुसार
११. हळद - १/२ टेबलस्पून
१२. लाला तिखट मसाला - १ टेबलस्पून
१३. धणे पावडर - १ टेबलस्पून
१४. बेसन - १/४ टेबलस्पून
१५. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
१६. साखर - १ टेबलस्पून
१७. कांद्याची पात - १ टेबलस्पून
१८. गव्हाचे पीठ - २ ते ३ कप
१९. कोथिंबीर - १ टेबलस्पून
२०. पांढरे तीळ - १ टेबलस्पून
नाश्त्याला करा पोटभरीची आणि चमचमीत ‘मसाला चपाती’, साध्या चपातीला खास मसाला ट्विस्ट....
कृती :-
१. सर्वप्रथम, गव्हाचे पीठ घेऊन चपातीसाठी जसे कणिक भिजवून घेतो तसे कणिक भिजवून पीठ मळून घ्यावे. हे पीठ मळून बाजूला झाकून ठेवून द्यावे.
२. कांदे उभे चिरुन घ्यावेत. त्यानंतर एका पॅनमध्ये थोडेसे तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, धणे, हिरवी मिरची, हिंग, आलं, बडीशेप घालून घ्यावे.
३. आता या तयार केलेल्या खमंग फोडणीत उभे चिरलेले कांदे घालावेत. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून २ ते ३ मिनिटे हे मिश्रण शिजू द्यावे.
४. आता हे मिश्रण शिजून झाल्यानंतर त्यात लाल तिखट मसाला, धणे पावडर घालावे.
१ चमचाभर तेलात करा ‘तवा भजी’, कुरकुरीत खमंग नेहमीचीच भजी नव्या रुपात, पण चव तशीच...
५. त्यानंतर त्या मिश्रणात बेसन, आमचूर पावडर, साखर, कांद्याची पात घालावी.
६. आता कणकेचे छोटे छोटे गोळे करून घ्यावेत त्यावर पांढरे तीळ व बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरवून घ्यावी. आता चपाती लाटून घ्यावी.
७. चपाती लाटून घेतल्यानंतर त्याच्या बरोबर मधोमध हे कांद्याचे तयार सारण भरावे. त्यानंतर ही चपाती चारही बाजुंनी फोल्ड करून परत लाटून घ्यावी.
८. आता एका पॅनमध्ये चारही बाजुंनी तेल सोडून त्यावर हा पराठा दोन्ही बाजुंनी खरपूस भाजून घ्यावा.
फक्त २ कप रवा आणि १ ग्लास ताक, आप्पे करा मस्त - गुबगुबीत फुललेले...
आता हा गरमागरम पराठा चटणी किंवा सॉस सोबत खाण्यासाठी सर्व्ह करावा.