Lokmat Sakhi >Food > २०२३ चा व्हायरल फूड ट्रेण्ड- कांद्याच्या टरफलांची पावडर! बघा कशी करायची- काय त्याचे फायदे?

२०२३ चा व्हायरल फूड ट्रेण्ड- कांद्याच्या टरफलांची पावडर! बघा कशी करायची- काय त्याचे फायदे?

How To Make Onion Peel Powder: २०२३ चे जे काही व्हायरल फूड ट्रेण्ड आहेत (viral food trend of 2023), त्यापैकी एक आहे कांद्याच्या सालींची किंवा टरफलांची पावडर, बघा कशी करायची ही पावडर आणि काय त्याचे फायदे....(Benefits of onion peel powder)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2023 04:18 PM2023-12-21T16:18:10+5:302023-12-21T16:18:59+5:30

How To Make Onion Peel Powder: २०२३ चे जे काही व्हायरल फूड ट्रेण्ड आहेत (viral food trend of 2023), त्यापैकी एक आहे कांद्याच्या सालींची किंवा टरफलांची पावडर, बघा कशी करायची ही पावडर आणि काय त्याचे फायदे....(Benefits of onion peel powder)

How to make onion peel powder, onion skin powder recipe, viral food trend of 2023, Benefits of onion peel powder | २०२३ चा व्हायरल फूड ट्रेण्ड- कांद्याच्या टरफलांची पावडर! बघा कशी करायची- काय त्याचे फायदे?

२०२३ चा व्हायरल फूड ट्रेण्ड- कांद्याच्या टरफलांची पावडर! बघा कशी करायची- काय त्याचे फायदे?

Highlightsकांद्याच्या टरफलांमध्ये जेवढे ॲण्टीऑक्सिडंट्स असतात, तेवढे ॲण्टीऑक्सिडंट्स कांद्यामध्येही नसतात. या टरफलांचा काढा प्यायल्यास चांगली झोप येते, असंही काही जण सांगतात. 

२०२३ मध्ये खाण्यापिण्याच्या अनेक गोष्टी व्हायरल झाल्या (viral food trend of 2023). काही रेसिपी सोशल मिडियावर गाजल्या तर काही रेसिपी सर्वाधिक लोकांनी ऑनलाईन मागवल्या. कोणत्या रेसिपींचा शोध गुगलवर सर्वाधिक घेतला गेला, अशा पदार्थांची यादीही गुगलने नुकतीच जाहीर केली होती. आता २०२३ मध्ये जे पदार्थांच्या रेसिपी इन्स्टाग्रामवर किंवा यु ट्यूबवर सर्वाधिक व्हायरल झाल्या (How to make onion peel powder), अशा पदार्थांमध्ये एक आहे कांद्याच्या सालींची किंवा टरफलांची पावडर.(onion skin powder recipe and its benefits)

 

आतापर्यंत कांद्याच्या साली किंवा टरफलं आपण सरळ कचऱ्यात टाकून देत होतो. किंवा या सालींचा उपयोग फार फार तर गार्डनिंगसाठी कसा करायचा हे आपल्याला माहिती होतं.

थंडीमुळे दही खूपच पातळ होतं? बघा १ सोपा उपाय- दही होईल घट्ट आणि चवदार

पण आताच्या या नविन ट्रेण्डनुसार आतापर्यंत बिनाकामाच्या समजल्या गेलेल्या या घटकाला फारच महत्त्व आले आहे. या टरफलांची पावडर करून ती आता विविध पदार्थांमध्ये टाकून खाण्यासाठी वापरली जात आहे. असं म्हणातात की कांद्याच्या टरफलांमध्ये जेवढे ॲण्टीऑक्सिडंट्स असतात, तेवढे ॲण्टीऑक्सिडंट्स कांद्यामध्येही नसतात. या टरफलांचा काढा प्यायल्यास चांगली झोप येते, असंही काही जण सांगतात. 

 

कशी करायची कांद्याच्या टरफलांची पावडर?

१. कांद्याच्या टरफलांची पावडर करण्यासाठी सगळ्यात आधी कांद्याची टरफलं २- ३ वेळा व्यवस्थित धुवून घ्या.

२. यानंतर ती एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्या.

घरात लावा ही ५ Good Luck झाडं, घर नेहमीच राहील पॉझिटीव्ह- आनंदी

३. यानंतर ही टरफलं एक तर उन्हात वाळायला टाका किंवा मायक्रोवेव्हमध्ये किंवा तवा- कढईवर टाकून गरम करा.

४. ही टरफलं पुर्णपणे कोरडी झाली पाहिजेत याची काळजी घ्या. जर हातांची ती सहज कुस्करली गेली तर ती कोरडी झाली आहेत, असं समजावं. 

५. यानंतर ही सगळी टरफलं मिक्सरमध्ये टाकून फिरवून घ्या आणि त्याची पावडर करा. ही पावडर एअर टाईट डबीत भरून ठेवली तर ६ महिने तरी चांगली राहते. वेगवेगळ्या पदार्थांवर ती चाट मसाला टाकतो, त्याप्रमाणे टाकून खाता येते. 

 

Web Title: How to make onion peel powder, onion skin powder recipe, viral food trend of 2023, Benefits of onion peel powder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.