Lokmat Sakhi >Food > कांदा- मिरचीचं चटकदार लोणचं, चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

कांदा- मिरचीचं चटकदार लोणचं, चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

How To Make Onion Pickle: घरात कोणतीच भाजी नसेल तर अशावेळी कांद्याचं लोणचं करून पाहा.. जेवणात मस्त चव येईल... (kandyacha loncha recipe in Marathi)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2024 04:23 PM2024-08-23T16:23:47+5:302024-08-23T16:24:24+5:30

How To Make Onion Pickle: घरात कोणतीच भाजी नसेल तर अशावेळी कांद्याचं लोणचं करून पाहा.. जेवणात मस्त चव येईल... (kandyacha loncha recipe in Marathi)

how to make onion pickle, simple and easy recipe of onion achar, kandyacha loncha recipe in Marathi | कांदा- मिरचीचं चटकदार लोणचं, चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

कांदा- मिरचीचं चटकदार लोणचं, चव इतकी भारी की भाजी- वरणाची गरजच नाही! बघा सोपी रेसिपी

Highlightsएखाद्या दिवशी घरात कोणतीच भाजी नसेल तर अशावेळी पोळी, भाकरीसोबत खाण्यासाठीही कांदा- मिरचीचं लोणचं अतिशय परफेक्ट आहे.

वरण- भात, भाजी- पोळी असं ताटात सगळं असलं तरी पण चटणी, कोशिंबीर आणि चटकदार लोणचं तोंडी लावायला लागतंच. लोणच्याशिवाय जेवणात मजा नसतेच, असं म्हणणारे कित्येक लोणचंप्रेमी आहेतच. म्हणूनच तर आपण नेहमी कैरी, लिंबू हे लोणचे तर घरात ठेवतोच. पण हिवाळ्यात गाजर, मुळा, कारलं असे इतर लोणचेही करतो. आता या लोणच्यांसोबतच कांद्याचं लोणचं करून पाहा (how to make onion pickle?). चव अतिशय चटकदार होते. हे लोणचं तर तुम्ही तोंडी लावण्यासाठी घेऊ शकताच (simple and easy recipe of onion achar). पण एखाद्या दिवशी घरात कोणतीच भाजी नसेल तर अशावेळी पोळी, भाकरीसोबत खाण्यासाठीही कांदा- मिरचीचं लोणचं अतिशय परफेक्ट आहे. (kandyacha loncha recipe in Marathi)

 

कांदा- मिरचीचं लोणचं करण्याची रेसिपी

साहित्य

२ मध्यम आकाराचे कांदे

३ ते ४ हिरव्या मिरच्या

२ लिंबांचा रस

गोकर्णाच्या वेलीला फुलंच येत नाहीत? चमचाभर तुरटीचा 'हा' उपाय करा, वेलीवर दिसतील फुलंच फुलं

१ टीस्पून मेथ्या

१ टीस्पून बडिशेप

२ टेबलस्पून लोणचं मसाला

आठवड्यातून एकदा चेहऱ्याला लावा 'हा' खास बर्फ, टॅनिंग जाऊन त्वचेवर येईल मस्त सोनेरी ग्लो

१ टेबलस्पून तेल

चवीनुसार मीठ

१ टीस्पून साखर

 

कृती

सगळ्यात आधी कांदा उभा चिरून घ्या. तुम्ही नेहमीच्या पद्धतीने आडवाही चिरू शकता.

यानंतर मिरच्यांचे दोन तुकडे करा आणि त्या उभ्या चिरा. मिरचीचे बारीक तुकडे करू नका.

मुलांची बुद्धिमत्ता वाढण्यासाठी मदत करणाऱ्या ६ गोष्टी, मेंदू होईल तल्लख, अभ्यासात करतील प्रगती

बडिशेप आणि मेथ्या भाजून घ्या आणि नंतर त्यांची मिक्सरमधून बारीक पावडर करून घ्या. हे नाही केलं तरी चालेल. कारण विकतच्या लोणचे मसाल्यात हे दोन्ही पदार्थ असतातच. पण लोणच्याला जर अधिक खमंग फ्लेवर आणायचा असेल तर मात्र  नक्की करा...

चिरलेला कांदा, मिरच्या एका भांड्यात घ्या. त्यामध्ये बडिशेप आणि मेथ्यांची पावडर, लोणचं मसाला, मीठ, साखर असं सगळं घाला आणि लिंबू पिळा.

नंतर एका छोट्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा आणि फोडणी करून घ्या. फोडणी थंड झाली की लोणच्यावर घाला. सगळं एकदा हलवून घ्या. हे लोणचं फ्रिजमध्ये ठेवल्यास ३ ते ४ दिवस टिकतं.

 

Web Title: how to make onion pickle, simple and easy recipe of onion achar, kandyacha loncha recipe in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.