Lokmat Sakhi >Food > कांदा भजी तर नेहमीच खाता! कांद्याचे कुरकुरीत 'रिंग' खाऊन पाहा- झटपट होणारी सोपी रेसिपी 

कांदा भजी तर नेहमीच खाता! कांद्याचे कुरकुरीत 'रिंग' खाऊन पाहा- झटपट होणारी सोपी रेसिपी 

How To Make Onion Ring: दिवाळीत घरी जेवायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी नेहमीच्या कांदा भजीपेक्षा हा एक वेगळा पदार्थ करून पाहा. पाहुणे खुश होऊन जातील..(simple and easy starter for party menu)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2024 03:23 PM2024-10-25T15:23:54+5:302024-10-25T15:24:38+5:30

How To Make Onion Ring: दिवाळीत घरी जेवायला येणाऱ्या पाहुण्यांसाठी नेहमीच्या कांदा भजीपेक्षा हा एक वेगळा पदार्थ करून पाहा. पाहुणे खुश होऊन जातील..(simple and easy starter for party menu)

how to make onion ring, kanda pakoda recipe by kunal Kapoor, simple and easy starter for party menu | कांदा भजी तर नेहमीच खाता! कांद्याचे कुरकुरीत 'रिंग' खाऊन पाहा- झटपट होणारी सोपी रेसिपी 

कांदा भजी तर नेहमीच खाता! कांद्याचे कुरकुरीत 'रिंग' खाऊन पाहा- झटपट होणारी सोपी रेसिपी 

Highlightsकधी काही चटपटीत खावंसं वाटलं तर अगदी १० मिनिटांत ही रेसिपी करता येते.

कोणत्याही पदार्थामध्ये कांदा घातला की त्या पदार्थाची चव आणखी वाढते. आता हेच बघा ना इतर कोणत्याही भजींपेक्षा नेहमीच कांदा भजी जास्त भाव खाऊन जातात. कांदा भजी आपण नेहमीच करतो. तुम्हाला जर ती मनापासून आवडत असतील तर एकदा कांदा भजीसारखाच पण थोडा वेगळ्या प्रकारचा ओनिअन रिंग हा पदार्थ ट्राय करून पाहा. सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर (Kunal Kapoor) यांनी ही रेसिपी इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे (simple and easy starter for party menu). कधी काही चटपटीत खावंसं वाटलं तर अगदी १० मिनिटांत ही रेसिपी करता येते. (how to make onion ring?)

 

कांदा रिंग करण्याची रेसिपी

साहित्य 

२ मध्यम आकाराचे कांदे

५ टेबलस्पून हरबरा डाळीचे पीठ किंवा बेसन

दिवाळीत आकर्षक लूक येण्यासाठी ८ सुंदर हेअरस्टाईल, करायला सोप्या आणि झटपट होणाऱ्या..

चवीनुसार लाल तिखट आणि मीठ

१ टीस्पून धणे पूड आणि जिरे पूड

१ टेबल स्पून कसूरी मेथी

१ टी स्पून हळद

१ कप ब्रेड क्रम्स

 

कृती

ही रेसिपी करण्यासाठी मध्यम आकाराचे कांदे  निवडा आणि ते गोलाकार कापून घ्या. गोलाकार चिरलेल्या कांद्याची प्रत्येक रिंग वेगळी करा. 

त्यानंतर एका भांड्यात बेसन घ्या. त्यामध्ये मीठ, तिखट, कसुरी मेथी, धणे- जिरेपूड असं सगळं साहित्य टाकून पाणी टाकून ते कालवून घ्या. एरवी भजी करायला आपण जसं पीठ भिजवतो, तसंच ते असावं.

रोज सकाळी चेहऱ्याला लावा 'या' पद्धतीने तयार केलेलं राईस वॉटर- दिवाळीपर्यंत पिगमेंटेशन गायब

आता भिजवलेल्या बेसन पिठामध्ये कांद्याचे काप टाका. व्यवस्थित सगळीकडून पीठ लागेल, हे एकदा पाहून घ्या. 

बेसन पीठ लावलेले कांद्याचे काप ब्रेड क्रम्समध्ये चांगले घोळून घ्या. 

गॅसवर कढई गरम करायला ठेवा. त्यात तेल टाका आणि ब्रेड क्रम्समध्ये घोळून घेतलेले कांद्याचे काप सोनेरी रंगाचे होईपर्यंत कुरकुरीत तळून घ्या. हा पदार्थ तुम्ही कोणत्याही पदार्थासोबत साईडर म्हणून किंवा मग स्टार्टर म्हणून देऊ शकता. 


 

Web Title: how to make onion ring, kanda pakoda recipe by kunal Kapoor, simple and easy starter for party menu

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.