Lokmat Sakhi >Food > ना मिक्सर- ना ज्यूसर, ५ मिनिटांत १ किलो संत्री- मोसंबीचा रस तयार, बघा सोपी पद्धत

ना मिक्सर- ना ज्यूसर, ५ मिनिटांत १ किलो संत्री- मोसंबीचा रस तयार, बघा सोपी पद्धत

How To Make Mosambi Juice Without Using Mixer Or Juicer: मिक्सर, ज्यूसर असं काहीही न वापरता संत्री किंवा मोसंबीचा रस पटापट कसा काढायचा ते पाहा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2024 04:14 PM2024-02-24T16:14:08+5:302024-02-24T16:15:05+5:30

How To Make Mosambi Juice Without Using Mixer Or Juicer: मिक्सर, ज्यूसर असं काहीही न वापरता संत्री किंवा मोसंबीचा रस पटापट कसा काढायचा ते पाहा...

How to make orange and sweet lime juice without using mixer or juicer, Easy and fast method of making santra and mosambi juice  | ना मिक्सर- ना ज्यूसर, ५ मिनिटांत १ किलो संत्री- मोसंबीचा रस तयार, बघा सोपी पद्धत

ना मिक्सर- ना ज्यूसर, ५ मिनिटांत १ किलो संत्री- मोसंबीचा रस तयार, बघा सोपी पद्धत

Highlightsसंत्री आणि मोसंबीचा रस मिक्सर, ज्यूसर असं काहीही न वापरता कसा काढायचा ते पाहा...

संत्री- मोसंबी ही लिंबूवर्गीय फळं तब्येतीसाठी अतिशय पोषक असतात. त्यातून भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि ॲण्टीऑक्सिडंट्स मिळतात. व्हिटॅमिन सी मुळे ही फळं रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खूप फायदेशीर तर आहेतच, पण त्वचा आणि केस यांचे आरोग्य उत्तम राखण्यासाठीही मदतीची आहेत. त्वचा दिर्घकाळ तरुण- चमकदार ठेवायची असेल तर संत्री- मोसंबी ही फळं नियमितपणे खायला पाहिजेत. काही जणांना ही फळं नुसती खाण्यापेक्षा त्यांचा रस प्यायला आवडतं (How to make orange and sweet lime juice without using mixer or juicer). म्हणूनच आता मिक्सर, ज्यूसर असं काहीही न वापरता एकदम सोप्या पद्धतीने संत्री- मोसंबीचा रस कसा काढायचा ते पाहा... (Easy and fast method of making santra and mosambi juice )

 

संत्री- मोसंबीचा रस कसा काढायचा?

कोणत्याही फळाचा रस करण्याऐवजी ते फळ तसंच खाणं जास्त चांगलं हे आपल्याला माहिती आहे. पण तरीही कधी घरातल्या वयस्कर व्यक्तींना, लहान बाळांना किंवा आजारी व्यक्तींना फळांचा रस द्यावा लागतो.

आंबटगोड- चटपटीत लब्दू किंवा गुळबोरं आवडतात? बघा लहानपणी शाळेसमोर मिळणाऱ्या 'त्या' बोरांची रेसिपी

किंवा कधी कधी आपल्यालाही फळं खाण्यापेक्षा त्यांचा ताजा फ्रेश ज्यूस प्यावा वाटतो. म्हणूनच संत्री आणि मोसंबीचा रस मिक्सर, ज्यूसर असं काहीही न वापरता कसा काढायचा ते पाहा...

एकदम सोप्या पद्धतीने संत्री- मोसंबीचा रस कसा काढायचा, याविषयीचा व्हिडिओ saritaskitchenofficial's या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. 

 

यासाठी सगळ्यात आधी संत्री किंवा मोसंबी मधोमध कापून तिचे २ तुकडे करून घ्या.

काळवंडलेल्या गुडघ्यांमुळे शॉर्ट ड्रेस घालणं नको वाटतं? १ सोपा उपाय- गुडघे लगेच स्वच्छ होतील

एक पातेलं घ्या आणि त्यावर गाळणं ठेवा. किंवा पुरणाची जाळी ठेवा. आता मोसंबीचा किंवा संत्रीचा अर्धा काप हाता घेऊन त्यावर व्हिस्क गोलाकार दिशेने फिरवत राहा. जसं जसं तुम्ही ते फिरवाल, तसा तसा रस गाळणीतून पातेल्यात पडत राहील. अशा पद्धतीने भराभर तुम्ही ज्यूस करू शकता. 


 

Web Title: How to make orange and sweet lime juice without using mixer or juicer, Easy and fast method of making santra and mosambi juice 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.