Lokmat Sakhi >Food > १ जुडी पालकाच्या करा कुरकुरीत वड्या, खास पद्धत-पालक नको म्हणणारेही चवीने खातील पालक वडी

१ जुडी पालकाच्या करा कुरकुरीत वड्या, खास पद्धत-पालक नको म्हणणारेही चवीने खातील पालक वडी

How to Make Palkachi Vadi : पालकाची भाजी बनवण्यापेक्षा पराठे, सूप, कटलेट, भजी असे पदार्थ बनवले तर सर्वचजण पालक आवडीने खातील.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2023 12:12 PM2023-10-25T12:12:53+5:302023-10-25T14:59:26+5:30

How to Make Palkachi Vadi : पालकाची भाजी बनवण्यापेक्षा पराठे, सूप, कटलेट, भजी असे पदार्थ बनवले तर सर्वचजण पालक आवडीने खातील.

How to Make Palkachi Vadi : Palak Vadi Recipe in Marathi Palak recipes spinachvadi | १ जुडी पालकाच्या करा कुरकुरीत वड्या, खास पद्धत-पालक नको म्हणणारेही चवीने खातील पालक वडी

१ जुडी पालकाच्या करा कुरकुरीत वड्या, खास पद्धत-पालक नको म्हणणारेही चवीने खातील पालक वडी

पालकाची भाजी खायला बऱ्याचदा मूलं नाक मुरडतात. (Cooking Hacks) काही घरांमध्ये तर मोठ्यांनाही पालकाची भाजी फारशी आवडत नाही. पालक चवीला थोडेफार कडवट असली तरी यात अनेक गुणकारी घटक असतात ते तब्येतीसाठी फायदेशीर ठरतात. (Palak Vadi Kashi karaychi) पालकाची भाजी बनवण्यापेक्षा पराठे, सूप, कटलेट, भजी असे पदार्थ बनवले तर सर्वचजण पालक आवडीने खातील. पालकाची कुरकुरीत, खमंग वडी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (Palak Vadi Recipe)

पालकाची वडी करण्याचे साहित्य

बारीक चिरलेला पालक- २ ते ३ वाटी

बेसन- १ ते दीड वाटी

गव्हाचे पीठ- १ वाटी

जीरं-  २ ते ३ चमचे

तीळ- २ ते ३ चमचे

मिरच्या- २ ते ३

ओवा - १ ते २ चमचे

लसूण- ५ ते ६ पाकळ्या

हळद-  २ टिस्पून

मीठ- चवीनुसार

तेल- तळण्यासाठी

पालक वडी करण्याची कृती (Palak Vadi Recipe)

१) सगळ्यात आधी पालकाचे देठ कापून कोमट पाण्यात स्वच्छ धुवून घ्या. २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्यातील माती पूर्ण निघून जाईल. त्यानंतर पालकाचे बारीक काप करून घ्या. 

२) मिक्सरच्या भांड्यात मिरची, लसूण, जीरं, कोथिंबीर घालून पेस्ट तयार करा. नंतर चिरलेल्या पालकांत १ कप बेसनाचे पीठ, १ कप गव्हाचे पीठ, लाल तिखट, हळद, ओवा, जीरं,  तीळ, मीठ आणि तळण्यासाठी तेल घाला. 

३) एक लिंबू पिळून घ्या नंतर या मिश्रणात पाणी घालून पीठ व्यवस्थित मळा आणि कणकेचा गोळा तयार करून घ्या. एका कढईत पाणी उकळवण्यासाठी ठेवा. पाण्यात भांडे ठेवण्याची रिंग ठेवा. 

अचानक दूध फाटलं तर ५ मिनिटांत करा हलवाईस्टाईल सुपर सॉफ्ट बर्फी; तोंडात टाकताच विरळेल

४) या रिंगवर गाळणी ठेवून त्यावर पीठाचा लांबट गोळा ठेवा. झाकण ठेवून १५ ते २० मिनटांसाठी वाफवून घ्या. नंतर झाकण काढून सुरीने किंवा चमच्याच्या साहाय्याने शिजले आहे की नाही ते तपासून पाहा. जर पीठ सुरीला चिकटले नाही तर समजा हा पीठाचा गोळा व्यवस्थित शिजला आहे.

५) जर सुरी टोचल्यानंतर पीठ चिकटले तर समजा अजून थोडावेळ शिजवावे लागेल. पूर्ण शिजल्यानंतर गॅस बंद करा आणि पिठाचा गोळा काढून थंड होऊ द्या.  

ढाबास्टाईल चमचमीत शाही पनीर घरीच करा; एकदम सोपी रेसिपी-दसऱ्याचा बेत होईल परफेक्ट

६) नंतर समान आकाराच्या वड्या कापून घ्या. कढईत तेल गरम करायला ठेवा. तेल गरम झाल्यानंतर या वड्या गोल्डन होईपर्यंत तळून घ्या. या वड्या जेवताना तोंडी लावण्यासाठी, डब्याला देण्यासाठी उत्तम पर्याय आहेत.
 

Web Title: How to Make Palkachi Vadi : Palak Vadi Recipe in Marathi Palak recipes spinachvadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.