कुठल्याही रेटॉरंटमध्ये गेल्यावर जेवणाच्या आधीची स्टार्टर डिश म्हणून पनीरलाच पसंती दिली जाते. स्टार्टर डिश मधील पनीर म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. पनीरचे असंख्य पदार्थ बनवले जातात. जेवणामध्ये स्टार्टर पासून ते मेन कोर्सपर्यंत सगळ्याच गोष्टीत पनीरचा वापर केला जातो. चावायला त्रासदायक नसणारा, अगदी मऊ असणारा पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खूपच मस्त लागतो. पनीरचे स्टार्टर खाण्यात मज्जा काही औरच असते( How to make Paneer at home).
पनीर सहज बाहेर विकत मिळतं. पण विकतचं पनीर महाग तर असतंच शिवाय त्यात भेसळ असण्याचीही शक्यता असते. आरोग्याच्या दृष्टीनं पौष्टिक असलेलं पनीर आपल्या आहारात नियमित असायला हवं. त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे पनीर घरी तयार (homemade paneer) करणं. पण घरी तयार केलेल्या पनीर बाबत अनेकांची तक्रार असते. घरी केलेलं पनीर कडक किंवा वातड होतं. परंतु पनीर तयार करण्याची योग्य रेसिपी फॉलो केल्यास घरी तयार केलेलं पनीर मऊ मुलायम (how to make soft paneer at home) होतं. यासाठीच घरच्याघरी पनीर तयार करण्याची सोपी कृती पाहूयात(how to make paneer at home in 30 minutes).
साहित्य :-
१. पाणी - अर्धा कप २. व्हिनेगर - १ टेबलस्पून ३. दूध - २ लिटर (फुल क्रिम मिल्क)
हिरव्या मिरच्या जास्त दिवस टिकाव्या, सडू नये म्हणून ‘हा’ खास उपाय- मिरच्या लवकर सडणार नाहीत...
उपवासाचे फराळाचे पदार्थ करण्यासाठी कोणतं तेल वापरावं? शेफ रणवीर ब्रार सांगतात ' हे ' तेल बेस्ट...
कृती :-
१. एक मोठं पातेलं घेऊन त्यात तळाशी आधी १/२ कप पाणी ओतावे. दूध पातेल्याच्या तळाशी लागू नये म्हणून भांड्यात दूध ओतण्याआधी थोडेसे पाणी ओतून घ्यावे. पाणी ओतल्यानंतर त्यात २ लिटर फुल क्रिम असणारे दूध ओतावे. आता या दुधाला एक उकळी येईपर्यंत हे दूध गॅसच्या मंद आचेवर ठेवून चमच्याने हळुहळु ढवळत राहावे. दुधाला एक उकळी आल्यानंतर गॅस बंद करावा. २. आता एका छोट्या बाऊलमध्ये व्हिनेगर घेऊन त्यात पाणी मिक्स करुन घ्यावे. पाणी आणि व्हिनेगर सम प्रमाणात घ्यावे. त्यानंतर हे पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण हळूहळू थोडे थोडे करून या गरम दुधात घालावे. दूध चमच्याने सतत ढवळत राहावे. थोड्यावेळाने दूध आणि पाणी वेगळे होऊ लागेल.
३. आता एका कॉटनच्या कपड्यात हे सगळे मिश्रण ओतून त्यातून जास्तीचे पाणी काढून घ्यावे व पनीर तसेच कापडात गुंडाळून ठेवून द्यावे. हे पनीर आता एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे. जेणेकरुन त्यातील व्हिनेगरची चव निघून जाईल. या कापडात गुंडाळलेल्या पनीरवर खलबत्ता किंवा वजनदार वस्तू ठेवून त्यातील जास्तीचे पाणी काढून घ्यावे.
अशाप्रकारे आपले घरगुती पनीर तयार आहे. बाहेरचे भेसळयुक्त विकतचे पनीर आणण्यापेक्षा आपण घरच्याघरी सोप्या पद्धतीने पनीर तयार करु शकतो.