Join us  

खा पनीर डोसा, घ्या अस्सल साऊथ इंडियन डाेशाची रेसिपी-नेहमीच्या डोशाला पनीरचा ट्विस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2024 4:25 PM

Typical South Indian Style Paneer Dosa Recipe: अस्सल साउथ इंडियन स्टाईल पनीर डोसा खायचा असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा.. (how to make paneer dosa?)

ठळक मुद्देगरमागरम पनीर डोसा चीज आणि बटर सोबत खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. एकदा नक्कीच चाखून पाहा.

इडली, डोसा, उत्तप्पा हे दक्षिणात्य पदार्थ सकाळच्या नाश्त्यामध्ये मिळाले तर आ हा हा! क्या बात है!! बहुतांश खवय्यांचा हा अतिशय आवडीचा नाश्ता. काही जण तर इडली डोशाच्या एवढे प्रेमात असतात की त्यांना इडली सांबार, मसाला डोसा हा बेत रात्रीच्या जेवणासाठीही चालतो. आता नेहमीच्या डोशापेक्षा किंवा मसाला डोशापेक्षा काहीतरी वेगळा डोसा खायचा असेल तर हा टिपिकल साऊथ इंडियन स्टाईल पनीर डोसा करून बघा..(how to make paneer dosa?)  रेसिपी अगदीच सोपी आणि अतिशय चटपटीत आहे. लहान मुलांसकट घरातल्या सगळ्यांनाच आवडेल...(typical south indian style paneer dosa recipe)

पनीर डोसा करण्याची रेसिपी 

 

साहित्य 

डोशाचे पीठ 

१ वाटी पनीरचे तुकडे 

२ मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे 

नवरात्री २०२४ : देवाच्या पितळेच्या मुर्ती स्वच्छ करण्यासाठी वापरा 'ही' खास वस्तू, देव दिसतील तेजपुंज

१ टेबलस्पून आलं- लसूण- मिरची पेस्ट 

१ टीस्पून हळद 

१ टेबलस्पून सांभर मसाला 

२ टेबलस्पून तूप 

 

कृती 

सगळ्यात आधी कढई गॅसवर गरम करायला ठेवा आणि तिच्यामध्ये तूप टाका. 

तूप गरम झाले की कांदा आलं- लसूण पेस्ट आणि चिमूटभर हळद टाकून परतून घ्या.

नवरात्रीसाठी अखंड वात तयार करताना ३ चुका करू नका, बघा अखंड वात कशी असावी... 

कांदा- लसणाचा कच्चा वास थोडा कमी झाला की त्यामध्ये पनीरचे तुकडे टाका आणि ते सगळं व्यवस्थित हलवून घ्या. 

यानंतर त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ, लाल तिखट आणि बाजारात विकत मिळत असलेला कोणताही सांबार मसाला घाला.

 

सगळं मिश्रण एकदा व्यवस्थित हलवून घ्या आणि १ ते २ मिनिटे कढईवर झाकण ठेवून वाफ काढून घ्या. 

यानंतर नेहमीप्रमाणे डोसा करा. डोसा होत आला की त्यावर आपण तयार केलेलं पनीरच स्टफिंग घाला आणि डाेसा दोन्ही बाजूंनी दुमडून घ्या. 

नवरात्री विशेष: वातीभोवती आलेली काजळी कशी काढावी? १ सोपा उपाय- दिवा अजिबात विझणार नाही

असा हा खमंग डाेसा थोडेसे बटर टाकून आणि थोडंसं चीज किसून सर्व्ह करा..

गरमागरम पनीर डोसा चीज आणि बटर सोबत खाण्याचा आनंद काही वेगळाच आहे. एकदा नक्कीच चाखून पाहा.

 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.पाककृती