Lokmat Sakhi >Food > झटपट चमचमीत पनीर मसाला करा घरीच ; चव हॉटेलपेक्षा भारी- आणि रेसिपी सुपरफास्ट 

झटपट चमचमीत पनीर मसाला करा घरीच ; चव हॉटेलपेक्षा भारी- आणि रेसिपी सुपरफास्ट 

Paneer Masala Recipe: एकदम झकास चवीची मस्त भाजी... आणि ती ही अगदी झटपट होणारी. अवघ्या १५ ते २० मिनिटांत सुपर यम्मी पनीर मसाला (paneer masala) तयार. ही बघा रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2022 01:01 PM2022-08-03T13:01:42+5:302022-08-03T13:06:58+5:30

Paneer Masala Recipe: एकदम झकास चवीची मस्त भाजी... आणि ती ही अगदी झटपट होणारी. अवघ्या १५ ते २० मिनिटांत सुपर यम्मी पनीर मसाला (paneer masala) तयार. ही बघा रेसिपी.

How to make paneer masala within few minutes? Paneer masala recipe by actress Bhagyashree | झटपट चमचमीत पनीर मसाला करा घरीच ; चव हॉटेलपेक्षा भारी- आणि रेसिपी सुपरफास्ट 

झटपट चमचमीत पनीर मसाला करा घरीच ; चव हॉटेलपेक्षा भारी- आणि रेसिपी सुपरफास्ट 

Highlightsघरच्याघरी झटपट पनीर मसाला कसा करायचा, याची सोपी रेसिपी अभिनेत्री भाग्यश्री हिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. साधा- सोपा- सुटसुटीत पद्धतीने केलेला स्वयंपाक ही तिची खासियत दिसते.

कधीकधी अचानक पाहूणे येतात. अगदी जवळचेच असतील तर त्यांना जेवणापर्यंत थांबण्याचा आग्रह केलाच जातो. आता असं ऐनवेळी पाहुण्यांसाठी (special food for guest) काहीतरी दमदार बेत व्हायलाच हवा ना.. अशावेळी ही भाजी अगदी परफेक्ट (perfect recipe of paneer masala) ठरेल. किंवा एखाद्या रविवारी स्वयंपाक करण्याचा खूपच कंटाळा येतो. काही तरी साधं- सुटसुटीत करावं पण ते चवदार असावं, असं वाटत असतं. अशावेळीही ही रेसिपी (food and recipe) तुमच्या कामाला येऊ शकते. किंवा सकाळची वेळ आहे. मुलांसाठी, नवऱ्यासाठी, स्वत:साठी झटपट डबा बनवायचा आहे आणि घरात कांद्याशिवाय दुसरी कोणतीच भाजी नाही, पण पनीर मात्र आहे.. तर अशावेळी सुद्धा तुम्ही अशी मस्त चवदार भाजी अवघ्या काही मिनिटांत करू शकता. (Paneer masala recipe by actress Bhagyashree)

 

घरच्याघरी झटपट पनीर मसाला कसा करायचा, याची सोपी रेसिपी अभिनेत्री भाग्यश्री हिने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. काही दिवसांपुर्वी लाल माठाची भाजी कशी करायची, याची रेसिपीही भाग्यश्रीने शेअर केली होती. साधा- सोपा- सुटसुटीत पद्धतीने केलेला स्वयंपाक ही तिची खासियत दिसते. रविवारी किंवा अचानक पाहूणे आल्यावर ती असा बेत करते असंही ती सांगतेय. तिच्या रेसिपीने पनीर मसाला करण्यासाठी खरोखरंच खूप काही पुर्वतयारी करण्याची गरज नाही. 

 

पनीर मसाला करण्यासाठी 
साहित्य

बटर, जिरे, बारीक चिरलेला १ कांदा, १ कांदा किसून घ्यायचा. लाल तिखट, गरम मसाला, धने- जिरे पूड एकेक टेबलस्पून, अर्धा टेबलस्पून बडीशेप, २ हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, १ टेबलस्पून लसूण आणि आल्याची पेस्ट, २०० ग्रॅम पनीर, अर्धा कप दूध.

मसालेदार भाजी होईल झणझणीत, सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर सांगतात खास ३ टिप्स
रेसिपी
- कढईमध्ये बटर गरम करून त्यात जिरे टाकून फोडणी करून घ्या.
- फोडणी झाल्यानंतर चिरलेला कांदा टाकून परतून घ्या.
- त्यानंतर त्यात हिरव्या मिरच्यांचे काप टाका.


- मिरच्या परतल्यानंतर त्यात किसलेला कांदा टाका आणि तो ही त्याचा कच्चा वास जाईपर्यंत व्यवस्थित परतून घ्या.
- त्यात आता लसूण आणि आल्याची पेस्ट टाकून परता.

वेटलॉससाठी उपयुक्त २ डिटॉक्स ड्रिंक्स, वजन कमी आणि त्वचाही होईल सुंदर- देखणी
- आता त्यात लाल तिखट, गरम मसाला, धने- जिरे पूड टाका. कढईवर झाकण ठेवून सगळ्या मिश्रणाला चांगली वाफ येऊ द्या. आणि त्यानंतर गॅस बंद करा.
- हे मिश्रण थोडं थंड झालं की ते मिक्सरमधून वाटून त्याची ग्रेव्ही करा. ही ग्रेव्ही पुन्हा कढईत टाका. त्यात अर्धा कप पाणी आणि अर्धा कप दूध टाकून उकळी येऊ द्या. आता त्यात मीठ टाका. आवडत असल्यास किचन किंग मसालाही टाकू शकता.
- सगळ्यात शेवटी या ग्रेव्हीमध्ये शॅलो फ्राय केलेले पनीरचे तुकडे टाका. ३ ते ४ मिनिटे कढईवर झाकण ठेवून वाफ येऊ द्या. 
- गरमागरम पनीर मसाला तयार. 

 

Web Title: How to make paneer masala within few minutes? Paneer masala recipe by actress Bhagyashree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.