Join us  

फक्त ५ मिनिटांत करा क्रिस्पी-खमंग पनीर पकोडे, करायला सोपा- नाश्त्यासाठी प्रोटीनफूल पदार्थ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 5:39 PM

How to make Paneer Pakoda : अजिबात तेलकट नसलेले पनीर पकोडे, पौष्टिकही आणि खंमगही

संध्याकाळच्यावेळी चहाबरोबर काही खावंस वाटलं तर तुम्ही बाहेरची भजी किंवा स्नॅक्स खात असाल. संध्याकाळच्यावेळी चटपटीत तितकंच कुरुकुरीत काही खायचं असेल तर तुम्ही पनीर पकोडा ट्राय करू शकता. (Paneer Pakoda Recipe) पनीर पकोडा बनवणं अगदी सोपं आहे. हा पकोडा बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही करावं लागणार नाही. फक्त बाजारातून फ्रेश पनीर आणावं लागेल. घरात उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून तुम्ही पनीर पकोडा बनवू शकता. (How to make paneer pakoda)

सगळ्यात आधी पनीरचे बारीक काप करून घ्या. पनीरचे तुकडे एका बाऊलमध्ये ठेवून त्यावर मीठ,  लाल तिखट, आलं-लसणाची पेस्ट घाला. ही पेस्ट व्यवस्थित लावून घ्या. एका बाऊलमध्ये बेसनाचं पीठ, मीठ, तिखट, हळद घालून एकत्र करा. त्यात पनीरचा एक तुकडा घोळवून तळून घ्या. हा पनीराचा कुरकुरीत नाश्ता तुम्ही संध्याकाळी चहाबरोबर खायला किंवा जेवणासाठीही  करू शकता.

पनीर क्रिस्पी बनवण्यासाठी पनीर घ्या आणि त्याचे लांबट तुकडे करा. आता एक वाडगा घ्या आणि त्यात कॉर्नफ्लोअर आणि थोडे मीठ मिक्स करा. यानंतर थोडे पाणी घालून त्याचे जाड द्रावण तयार करा. आता या द्रावणात पनीरचे तुकडे टाका आणि चांगले मॅरीनेट करा. कढईत तेल टाकून मध्यम आचेवर गरम करा. तेल गरम झाल्यावर मॅरीनेट केलेले पनीरचे तुकडे घालून तळून घ्या. गोल्डन ब्राऊन झाल्यावर पनीरचे तुकडे एका प्लेटमध्ये काढा.

पुऱ्या खूप तेलकट होतात? ३ टिप्स, कमी तेलात होतील कुरकुरीत, टम्म फुगलेल्या पुऱ्या

आता दुसरा एक पॅन घ्या आणि त्यात थोडे तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर आले-लसूण पेस्ट घालून हलके परतून घ्या. आता त्यात चिरलेली हिरवी मिरची आणि सिमला मिरची घालून शिजू द्या. मिरच्या मऊ झाल्यानंतर त्यात लाल मिरची पावडर आणि टोमॅटो सॉस, सोया सॉस, लाल मिरची सॉससह सर्व सॉस घाला आणि चांगले मिसळा. त्यानंतर त्यात मीठ टाका आणि एकजीव करा. ग्रेव्ही चांगली शिजल्यानंतर त्यात आधी तळलेले पनीरचे तुकडे घालून ग्रेव्हीमध्ये चांगले मिसळा. आता 1-2 मिनिटे शिजू द्या. त्यावर हिरव्या कांद्याची पाने आणि थोडी साखर घाला. यानंतर गॅस बंद करा. चविष्ट पनीर क्रिस्पी तयार आहे.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न