कुठल्याही रेटॉरंटमध्ये गेल्यावर जेवणाच्या आधीची स्टार्टर डिश म्हणून पनीरलाच पसंती दिली जाते. स्टार्टर डिश मधील पनीर म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा विषय असतो. पनीरचे असंख्य पदार्थ बनवले जातात. जेवणामध्ये स्टार्टर पासून ते मेन कोर्सपर्यंत सगळ्याच गोष्टीत पनीरचा वापर केला जातो. चावायला त्रासदायक नसणारा, अगदी मऊ असणारा पनीर वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये खूपच मस्त लागतो. पनीरचे स्टार्टर खाण्यात मज्जा काही औरच असते.
कुठलाही सणवार म्हटला किंवा काही खास प्रसंग असला की पनीरशिवाय जेवणाचा बेत पूर्ण होऊच शकत नाही. पनीर हा एक असा पदार्थ आहे की त्याला कोणत्याही मसाल्यांमध्ये घोळवले की तो त्याची चव घेऊन अधिक स्वादिष्ट लागतो. पनीर ६५, पनीर चिली, पनीर कोफ्ता, पनीर लाबाबदार, पनीर टिक्का असे पनीरचे अनेक प्रकार स्टार्टरमध्ये नक्कीच खाल्ले असतील. पनीर हा शाकाहारी जेवणातील खास शाही पदार्थ मानला जातो. काहीवेळा आपण घरीच नासलेल्या दुधाचे पनीर (Homemade Paneer) बनवतो तर कधी बाहेरून विकत आणतो. काहीवेळा संपूर्णपणे व्हेगन असणारे किंवा डेअरी प्रॉडक्ट्सची एलर्जी (Lactose free paneer) असणारे लोक दुधापासून तयार केलेले पनीर खाणे टाळतात अशावेळी या लोकांसाठी घरच्या घरी दुधाचा वापर न करता पनीर बनवण्याची सोपी रेसिपी(how to make paneer without milk at home).
पनीर बनवण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. शेंगदाणे - २५० ग्रॅम
२. लिंबू किंवा व्हिनेगर
३. कॉटनचा पातळ कपडा
दसरा स्पेशल : सीताफळाचा गर काढण्याची सोपी ट्रिक वापरून घरीच बनवा दाटसर, गोड बासुंदीचा झक्कास बेत...
कृती :-
१. शेंगदाणे ६ ते ७ तासांसाठी सालीसकट पाण्यात भिजत ठेवा.
२. ६ ते ७ तासानंतर हे शेंगदाणे ३ ते ४ वेळा स्वच्छ पाण्यातून व्यवस्थित धुवून घ्यावे.
३. शेंगदाणे व्यवस्थित धुवून घेतल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात अर्धा लिटर पाणी व हे भिजवलेले शेंगदाणे घालून व्यवस्थित मिश्रण वाटून घ्यावे.
४. हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेले मिश्रण एका भांड्यात घेऊन गॅसच्या मंद आचेवर हलकेच गरम करून घ्यावे.
५. गरम करून घेतल्यानंतर एका कॉटनच्या पातळ कपड्यातून गाळून या शेंगदाण्याचे दूध काढून घ्यावे.
६. शेंगदाण्याचे दूध काढून घेतल्यानंतर ते पुन्हा एकदा गॅसच्या मंद आचेवर ठेवून गरम करून घ्यावे.
७. यानंतर आपण नेहमीप्रमाणे दूध फाटण्यासाठी जसे त्यात लिंबू पिळतो, तसेच या शेंगदाण्याच्या दुधात देखील लिंबू किंवा व्हिनेगर घालावे. (लिंबू किंवा व्हिनेगरपैकी कशाचाही वापर करताना ते डायरेक्ट दुधात न घालता लिंबाचा रस किंवा व्हिनेगर पैकी एक, आणि पाणी यांचे समप्रमाण घेऊन मग ते या दुधात घालावे, दुधात हे मिश्रण घालताना हळुहळु एक एक चमचा हे मिश्रण घालावे एकदम एकाचवेळी घालू नये)
उपवासाची भजी खाता आली तर काय मजा ना ? करा चमचमीत उपवासाची भजी, पाहा रेसिपी...
८. त्यानंतर हे मिश्रण चमच्याच्या मदतीने ढवळून घ्यावे.
९. जेव्हा यात हलक्याशा गुठळ्या तयार होऊ लागतील तेव्हा हे मिश्रण कापडातून गाळून घ्यावे. गाळून त्यात तयार झालेलं पनीर पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे.
१०. त्यानंतर या तयार झालेल्या कापडातील पनीरवर काहीतरी वजनदार वस्तू ठेवून त्यातील सगळे पाणी निथळू द्यावे.
भगर कधी कोरडी होते तर कधी अगदीच गचका ? ३ सोप्या टिप्स - भगर होईल मऊ - मोकळी...
आपले पनीर वापरण्यासाठी तयार आहे. हे पनीर वापरुन आपण त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनवू शकता.