नेहमीच्या जेवणानंतर भात, भाजी असे पदार्थ नेहमीच उरतात. उरलेलं जेवण नेहमीच पुन्हा पुन्हा गरम करून खाण्यापेक्षा त्यापासून काही वेगळे पदार्थ बनवले तर खाण्याची मजाच काहीतरी वेगळी असेल. (Leftover rice papad Recipe) भात उरला असेल तर फोडणीचा भात किंवा लेमन राईस बनवला जातो. पण याच भाताचा तुम्ही वर्षभर टिकणारा पदार्थ बनवू शकता. तांदळाचे पापड खायला कुरकुरीत, क्रिस्पी आणि वर्षभर टिकायला चांगले असतात. उरलेल्या भातापासूनही तुम्ही खमंग पापड बनवू शकता. (How to make papad from leftover rice)
उरलेल्या भाताचे पापड करण्यासाठी सगळ्यात आधी उरलेला भात एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्या. त्यात १ कप पाणी घालून मिक्सरला लावून बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका भांड्यात काढून घ्या त्यानंतर मिक्सरमध्ये उरलेला भात आणि पाणी घालून पेस्ट बारीक करा. यात मीठ, जीरं, कोथिंबीर आणि लाल मिरच्या कुटून भाताच्या मिश्रणात घाला आणि व्यवस्थित एकजीव करून घ्या. एका प्लास्टीकच्या कागदावर पळी पापडाप्रमाणे पापड घालून हे पापड २ ते ३ दिवस कडक उन्हात हे पापड सुकवल्यानंतर पापड व्यवस्थित तळून घ्या.
बाहेरून कुरकुरीत आतून सॉफ्ट मेदूवडे घरीच करा; कमी तेल पिणाऱ्या, क्रिस्पी वड्यांची रेसिपी
शिळ्या तांदळात मायक्रो न्युट्रिएंट्स, मिनरल्स आणि आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियमसारखी इतर पोषक तत्व असतात. नियमित शिळा भात खाल्ल्यानं तब्येतीलाही बरेच फायदे मिळतात. पोषणतज्ज्ञ सांगतात की, तांदळाच ते कार्ब्स असतात ते रात्रभर भात तसाच ठेवल्यानं कमी होतात. आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी शिळे तांदूळ उत्तम आहेत. तांदळात प्री बायोटिक्स असतात जे फायबर्सचा चांगला स्त्रोत आहे. तांदळात फायबर्सचे उत्तम प्रमाण असते जे शरीरासाठी फायदेशीर ठरते.