Lokmat Sakhi >Food > रेस्टॉरण्टस्टाइल पण अजिबात तेलकट आणि वातड नसलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल घरीच करण्याची सोपी रेसिपी...

रेस्टॉरण्टस्टाइल पण अजिबात तेलकट आणि वातड नसलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल घरीच करण्याची सोपी रेसिपी...

How to make Papad Spring Roll Quick and easy recipe : स्प्रिंग रोल आवडतात पण अनेकदा ते तेलकट, वातड होतात, ते होऊ नयेत म्हणून खास उपाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2023 01:03 PM2023-05-20T13:03:08+5:302023-05-20T13:18:27+5:30

How to make Papad Spring Roll Quick and easy recipe : स्प्रिंग रोल आवडतात पण अनेकदा ते तेलकट, वातड होतात, ते होऊ नयेत म्हणून खास उपाय

How To Make Papad Spring Rolls At Home | रेस्टॉरण्टस्टाइल पण अजिबात तेलकट आणि वातड नसलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल घरीच करण्याची सोपी रेसिपी...

रेस्टॉरण्टस्टाइल पण अजिबात तेलकट आणि वातड नसलेले कुरकुरीत स्प्रिंग रोल घरीच करण्याची सोपी रेसिपी...

स्प्रिंग रोल हे अनेकांना स्टार्टर्स म्हणून खायला आवडत असून ती अतिशय लोकप्रिय डिश आहे. स्प्रिंग रोल हा मुख्यतः एक चायनीज पदार्थ आहे. त्यात न्युडल्स किंवा वेगवेगळ्या भाज्यांचे मिश्रण भरून ते स्टफ केले जाते. आत असलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि चायनीज सॉस यांच्या मिश्रणाने या स्प्रिंग रोलसची चव अधिकच वाढते. आतील भाज्यांचे स्टफिंग आणि वरून कुरकुरीत आवरण यामुळे स्प्रिंग रोलस खायला चविष्ट आणि क्रिस्पी लागतात. या स्प्रिंग रोल मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्प्रिंग रोल आपल्याला पहायला मिळतात. चायनीज स्प्रिंग रोल, न्युडल्स स्प्रिंग रोल, व्हेजिटेबल स्प्रिंग रोल, शेजवान स्प्रिंग रोल असे असंख्य स्प्रिंग रोलसचे प्रकार आजपर्यंत आपण खाल्ले असतील.  

आपण स्प्रिंग रोलस शक्यतो हॉटेल्स किंवा मोठ्या रेस्टोरंट मध्येच खातो. आपल्यापैकी काहीजणांना वाटते की स्प्रिंग रोल घरी बनवणे खूप कठीण काम आहे. परंतु असे नसून आपण घरच्या घरी देखील झटपट स्प्रिंग रोलस बनवू शकतो. स्प्रिंग रोल बनवताना आपल्याला जर मैद्याची पारी वापरयाची नसेल तर आपण उडदाच्या पापडाचा वापर करून देखील स्प्रिंग रोलस घरीच बनवू शकतो. घरात काही पार्टी, फंक्शन, सण, समारंभ असेल तर आपण अशावेळी पार्टी टाइम स्नॅक्स किंवा जेवणाच्या आधी स्टार्टर्स म्हणून देखील पापडाचे स्प्रिंग रोल्स बनवू शकतो. घरच्या घरी झटपट तयार होणार हा स्टार्टर नक्की बनवायचा कसा त्याचे साहित्य व कृती समजून घेऊयात(How to make Papad Spring Roll Quick and easy recipe).       

साहित्य :- 

१. कोबी - १ कप (लांब, बारीक चिरून घेतलेला)
२. लाल शिमला मिरची - १ कप (लांब, बारीक चिरून घेतलेली)
३. पिवळी शिमला मिरची - १ कप (लांब, बारीक चिरून घेतलेली) 
४. हिरवी शिमला मिरची - १ कप (लांब, बारीक चिरून घेतलेली) 
५. शेजवान सॉस - १ टेबलस्पून 
६. मीठ - १ टेबलस्पून 
७. उडदाचा पापड - ५ ते ६ 
८. तेल - २ ते ३ टेबलस्पून 
९. पाणी - १ कप 

१ कपभर रव्याच्या ‘सालपापड्या’, छोटीशी पापडी हातभर फुलते- पारंपरिक पापडीची भारी रेसिपी...

१ चमचाभर तेलात करा ‘तवा भजी’, कुरकुरीत खमंग नेहमीचीच भजी नव्या रुपात, पण चव तशीच...

कृती :- 

१. लांब, बारीक चिरून घेतलेला कोबी, तसेच सगळ्या रंगांच्या शिमला मिरची लांब, बारीक आकारात कापून घेतलेल्या एका पॅनमध्ये घालाव्यात.  
२. त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व शेजवान सॉस घालावा आता हे २ ते ३ मिनिटे मंद आचेवर किंचित क्रिस्पी होईपर्यंत शिजवून घ्यावे. 
३. आता एक उडदाचा पापड घेऊन तो किंचित पाण्यात बुडवून घ्यावा. 
४. त्यानंतर या ओल्या झालेल्या पापडाच्या बरोबर मधोमध तयार करून घेतलेले शिमला मिरची आणि कोबीचे स्टफिंग भरावे. 

नाश्त्याला करा पोटभरीची आणि चमचमीत ‘मसाला चपाती’, साध्या चपातीला खास मसाला ट्विस्ट....


५. आता या पापडाची गोल गोल गुंडाळी करुन त्याचा रोल तयार करून घ्यावा. 
६. एका पॅनमध्ये थोडेसे तेल सोडून त्यावर हे पापडाचे रोल दोन्ही बाजुंनी शॅलो फ्राय करुन घ्यावेत. 
७. या क्रिस्पी रोल्सला दोन्ही बाजुंनी छान खरपूस रंग येईपर्यंत भाजून घ्यावे.     

ना डाळ-तांदूळ भिजवण्याची गरज, ना आंबवण्याची; १० मिनिटांत करा गव्हाच्या पिठाचे डोसे...

पापडाचे स्प्रिंग रोल्स खाण्यासाठी तयार आहेत. शेजवान सॉस किंवा टोमॅटो सॉस सोबत हे गरमागरम पापडाचे स्प्रिंग रोल्स खाण्यासाठी सर्व्ह करावेत.

Web Title: How To Make Papad Spring Rolls At Home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.