Join us  

पपई खाऊन कंटाळा आला असेल तर करा पपईचा शिरा, वेगळ्या चवीची स्वीट डिश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2022 8:05 PM

How to make papaya shira: कोणत्याही ऋतूत खाल्ली तरी पपई शरीराला फायदेशीरच ठरते. पण नुसती पपई खाण्याचाही कंटाळा आला तर करा पपईची मिठाई.. 

ठळक मुद्देकमी गोड पपई खाण्याचा कंटाळा आला तर पपईचा शिरा हा चविष्ट पर्याय आहे. पपईच्या शिऱ्यासाठी कमी पिकलेली पपई घ्यावी.

 How to make papaya shira? पपई म्हणजे परवडणारं फळ. कोणत्याही ऋतूत खाल्ली तरी पपई शरीराला फायदेशीरच ठरते.  पण नुसती पपई खाण्याचाही कंटाळा येतो. तो घालवण्यासाठी पपई फळ म्हणून नाही तर मिठाई म्हणून खावी असा सल्ला आहर तज्ज्ञ देतात. पपई, दूध पावडर आणि सुका मेवा घालून पपईचा शिरा करता येतो. पपईचा शिरा करण्याची पध्दत सोपी आहे.

Image: Google

पपईचा शिरा कसा करायचा?

पपईचा शिरा करण्यासाठी 5 कप किसलेली पपई . पपई जास्त पिकलेली नसावी. 4 चमचे तूप, वेलची पूड, अडीच चमचा दूध पावडर, चवीनुसार साखर आणि सुकामेवा घ्यावा. 

Image: Google

पपईचा शिरा करताना कढईत तूप घालून ते गरम करावं. तूप गरम झालं की त्यात किसलेली पपई टाकावी. पपई मंद आचेवर 10-15 मिनिटं परतून घ्यावी. मिश्रणाचा रंग बदलेपर्यंत आणि पपईचा रस पूर्ण शोषला गेला की त्यात साखर घालावी. साखर घातल्यानंतर मिश्रण पुन्हा भाजावं. मिश्रण तूपही सोडायला लागलं की त्यात दूध पावडर घालावी. 

Image: Google

भाजल्या गेलेल्या पपई मिश्रणात दूध पावडर आणि वेलची पावडर घालून ते चांगलं मिसळून घ्यावं.  दूध पावडर घातल्यानंतर शिरा आणखी 10 मिनिटं मंद आचेवर परतावा.  नंतर हलव्यात थोडा सुकामेवा घालावा. तो चांगला मिसळून गॅस बंद करावा. कमी गोड निघालेली पपई खायचा कंटाळा आल्यास पपईचा शिरा हा पपईचा चविष्ट पर्याय आहे. 

 

टॅग्स :अन्नकिचन टिप्सफळे