Join us  

ना पीठ मळायची कटकट, ना लाटायची झंझट; 'या' सोप्या पद्धतीनं करा पौष्टीक, खमंग पराठे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2022 2:22 PM

How to make paratha without rolling pin : हे पराठे अगदी पुरीप्रमाणे फुगतात आणि चविष्ट लागतात.

चपाती, भाकरी हे  तेचतेच पदार्थ खाऊन कंटाळा आला की नेहमीच काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते. पराठे किंवा नान खायला चटपटीत असले तरी बनवायला बराचवेळ जातो. (No Rolling No Kneading Paratha Recipe) म्हणून असे पदार्थ बनवणं टाळलं जातं. आवडत्या भाज्या आणि  घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून तुम्ही न लाटता सुंदर पराठे बनवू शकता. हे पराठे अगदी पुरीप्रमाणे फुगतात आणि चविष्ट लागतात. (Cooking Tricks & Tips)

१) सगळ्यात आधी चण्याच्या पीठात लाल तिखट, हळद, कोथिंबीर, मसाले, मीठ, चिरलेला कांदा, चिली फ्लेक्स, टोमॅटो घाला. त्यानंतर पाणी घालून मिश्रण एकजीव करा. 

२) जास्त पातळ किंवा जास्त घट्ट न ठेवता हे मिश्रण  डोश्याप्रमाणे तव्यावर घालता येईल असं मध्यम ठेवा. त्यानंतर तवा गरम झाल्यावर पराठा तव्यावर पसरवा. 

३) कडेने तेल सोडा. एक बाजू झाल्यानंतर दुसरी बाजू व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. तयार आहेत गरमागरम पराठे. हे पराठे तुम्ही दही किंवा सॉसबरोबर  खाऊ शकता. 

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स