चायनिज पदार्थांप्रमाणेच इटालियन पदार्थही (Italian Dish) आपल्याकडे अतिशय फेमस आहे. पिझ्झा आणि पास्ता आवडीने खाल्ला जाते. शिवाय भारतात पास्तामध्ये विविध प्रकारही केले जातात. इटालियन पास्ता वगळता, भारतात मसाले घालून पास्ता तयार करतात. देसी पास्ता खाल्ल्याने पोट तर भरतेच, शिवाय चवीलाही भन्नाट लागते. पास्ता बनवण्याची कृती फार मोठी नाही. पण जर आपल्याला भूक लागली असेल, आणि चमचमीत काहीतरी झटपट खाण्याची इच्छा झाली असेल तर, कुकरमध्ये नो सॉस पास्ता करून पाहा (No Sauce Pasta).
पास्तामध्ये सॉस असेल तर, क्रिमी पास्ता खाताना मज्जा येते. पण जर त्यात सॉस नसेल तर, पास्ता पूर्णपणे खाल्ला जात नाही (Cooking Tips). जर आपल्याला सॉस शिवाय तेही कुकरच्या एका शिट्टीमध्ये नो सॉस पास्ता तयार करायचा असेल तर ही रेसिपी पाहा(How To Make Pasta When You Have No Sauce).
नो सॉस पास्ता करण्यासाठी लागणारं साहित्य
तेल
बटर
लसूण
२ गाजराचे करा चमचमीत लोणचे, चव चटकदार-कराल जेवण पोटभर
कांदा
टोमॅटो
हळद
लाल तिखट
गरम मसाला
टोमॅटो सॉस
शेजवान सॉस
मक्याचे दाणे
गाजर
सिमला मिरची
चीज
ऑरिगॅनो
चिली फ्लेक्स
कृती
सर्वप्रथम, कुकरच्या भांड्यात एक चमचा तेल, एक टेबलस्पून बटर घाला. बटर विरघळल्यानंतर त्यात २ चमचे बारीक चिरलेला लसूण आणि एक बारीक चिरलेला कांदा घालून भाजून घ्या. कांदा लालसर झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घाला. टोमॅटो भाजून घेतल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, एक चमचा गरम मसाला, २ टेबलस्पून टोमॅटो सॉस, २ टेबलस्पून शेजवान सॉस आणि चवीनुसार मीठ घालून मिक्स करा. मसाले भाजून घेतल्यानंतर त्यात २ टेबलस्पून मक्याचे दाणे, एक कप बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली ढोबळी मिरची घालून २ मिनिटांसाठी मिक्स करा. २ मिनिटानंतर त्यात शिजलेला एक बाऊल पास्ता घालून मिक्स करा.
दुधावर येईल घट्ट साय, दूध तापवताना लक्षात ठेवा ५ टिप्स; मिळेल भरपूर साय
पास्ता घातल्यानंतर त्यात दीड कप पाणी घालून त्यावर प्रेशर कुकरचं झाकण लावा. एक शिट्टी आल्यानंतर गॅस बंद करा. नंतर झाकण उघडा आणि त्यावर २ चीज स्लाईस, ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून मिक्स करा. अशा प्रकारे एका शिट्टीत तयार करा चमचमीत नो सॉस पास्ता.