Join us  

पारंपारिक पाटवडी जमतच नाही? कपभर बेसनाची करा खमंग पाटवडी; कमी वेळात डिश रेडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2024 6:43 PM

How to make Patwadi recipe with Easy Tricks : श्राद्धाचे ताट 'पाटवडी'शिवाय अपूर्ण; पाहा सोपी रेसिपी

१८ सप्टेंबरपासून पितृ पक्षाला सुरुवात झाली आहे (Pitru Paksha). हिंदू धर्मात श्राद्ध पक्षाला विशेष महत्व आहे. या काळात विविध प्रकारचे पदार्थ तयार करून पितरांसाठी प्रसाद तयार केला जातो (Food). उडीद डाळ वडे, अळू वडी, विविध प्रकारच्या भाज्या, पुरणपोळी आणि पाटवडी केली जाते (Patwadi).

पाटवडी ही रेसिपी महाराष्ट्रीयन घरांमध्ये केली जाते. प्रत्येकाची पाटवडी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे (Cooking Tips). पण अनेकांना पाटवडी परफेक्ट करायला जमेलच असे नाही. बऱ्याचदा पाटवडी कडक किंवा त्याचं मिश्रण पातळ होतं. जर आपल्याला पाटवडी परफेक्ट करायला जमत नसेल तर, या पद्धतीने करून पाहा. पाटवडी परफेक्ट जमतील(How to make Patwadi recipe with Easy Tricks).

लुसलुशीत पाटवडी करण्यासाठी लागणारं साहित्य

बेसन

कोथिंबीर

हिरवी मिरची

लसूण

जिरं

ओवा

पाणी

पांढरे तीळ

चपाती खाऊन वजन वाढतं? 'या' पिठाच्या चपात्या खा; वेट लॉस होईल - भुकेवरही राहील कंट्रोल

कोथिंबीर

किसलेलं खोबरं

कृती

सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यात कोथिंबीर, हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या, जिरं आणि ओवा घालून वाटून घ्या. तयार खर्डा एका वाटीमध्ये काढून घ्या.

एका बाऊलमध्ये एक वाटी बेसन आणि पाणी घालून मिक्स करा. नंतर चवीनुसार मीठ घाला. आता पॅन गरम करण्यासाठी ठेवा. त्यात २ चमचे तेल घाला. तेल गरम झाल्यानंतर त्यात वाटण, हिंग, हळद, पांढरे तीळ आणि कोथिंबीर घालून मिक्स करा.

बेसनाचे करा तोंडात विरघळणारे लाडू; ना फसतील ना कडक होतील; पौष्टीक लाडवाची पाहा रेसिपी

वाटण भाजून घेतल्यानंतर त्यात कपभर पाणी घाला. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात बेसानाचं बॅटर घालून मिक्स करा. मिश्रण घट्ट झाल्यानंतर एका ताटामध्ये पसरवा. नंतर त्यावर पांढरे तीळ, कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं पसरवा. शेवटी सुरीने कट करा. अशा प्रकारे लुसलुशीत पाटवडी खाण्यासाठी रेडी.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.