Lokmat Sakhi >Food > आता करा बिनातेलाची पावभाजी! तेल- तूप- बटर घालण्याची गरजच नाही... तरी भाजी होईल चविष्ट आणि झटपट

आता करा बिनातेलाची पावभाजी! तेल- तूप- बटर घालण्याची गरजच नाही... तरी भाजी होईल चविष्ट आणि झटपट

Pav bhaji without oil and butter: पावभाजी म्हणजे भरपूर तेल आणि बटर (no butter and no oil) यांचा वापर. पण या दोन्ही पदार्थांचा अजिबातच वापर न करताही उत्तम पावभाजी करता येते. बघा त्याचीच ही रेसिपी.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 02:06 PM2022-09-12T14:06:40+5:302022-09-12T14:07:26+5:30

Pav bhaji without oil and butter: पावभाजी म्हणजे भरपूर तेल आणि बटर (no butter and no oil) यांचा वापर. पण या दोन्ही पदार्थांचा अजिबातच वापर न करताही उत्तम पावभाजी करता येते. बघा त्याचीच ही रेसिपी.

How to make Pav bhaji without oil and butter, Tasty pav bhaji with no butter and no oil | आता करा बिनातेलाची पावभाजी! तेल- तूप- बटर घालण्याची गरजच नाही... तरी भाजी होईल चविष्ट आणि झटपट

आता करा बिनातेलाची पावभाजी! तेल- तूप- बटर घालण्याची गरजच नाही... तरी भाजी होईल चविष्ट आणि झटपट

Highlightsतेल आणि तूप न वापरता केलेली पावभाजी, असाही काही पर्याय असतो, याचा आपण विचारच करत नाही. म्हणूनच तर ही बघा एक खास रेसिपी.

पावभाजी हा अनेक जणांचा आवडीचा पदार्थ (recipe of pav bhaji). महिन्यातून एकदा किंवा काही जणं तर अगदी आठवड्यातून एकदा पावभाजीचा यथेच्छ आस्वाद घेत असतात. लहान मुलांचाही हा अगदी आवडता मेन्यू. त्यामुळे बऱ्याचशा वाढदिवसाच्या पार्ट्यांनाही पावभाजी (How to make Pav bhaji without oil and butter?) हमखास असतेच असते. शिवाय पावभाजीच्या माध्यमातून मुलांच्या पोटात सगळ्याच भाज्या जातात. त्यामुळे मुलांना पावभाजी देताना त्यांच्या आईही खूश असतात. आता या भाजीत भरपूर तेल आणि बटर असते शिवाय आपण ती मैद्यापासून तयार झालेल्या पावसोबत खातो, त्यामुळे अनेक हेल्थ कॉन्शस व्यक्ती पावभाजी (favorite food pav bhaji) खाणं टाळतात.

 

मैद्याच्या पावऐवजी आपण पोळी किंवा ब्राऊन ब्रेडचा विचार करू शकतो. पण तेल आणि तूप न वापरता केलेली पावभाजी, असाही काही पर्याय असतो, याचा आपण विचारच करत नाही. म्हणूनच तर ही बघा एक खास रेसिपी. या बिनातेलाच्या पावभाजीची रेसिपी इन्स्टाग्रामच्या kids.food.ideas.indian या पेजवर शेअर करण्यात आली आहे. तेल- तूप- बटर यांचा वापर न करताही चवदार पावभाजी कशी करता येते, ते बघूया.

 

कशी करायची बिनातेलाची पावभाजी?
साहित्य

२ कांदे, २ टोमॅटो, २ बटाटे, ३ सिमला मिरची, अर्धी वाटी चिरलेली पत्ताकोबी, अर्धी वाटी फ्लॉवर, तुम्हाला आवडणाऱ्या इतर भाज्या अर्धी ते पाऊण वाटी, २ टेबलस्पून पावभाजी मसाला, अर्धी वाटी भिजलेली तूर डाळ, चवीनुसार तिखट आणि मीठ.
कृती
१. वरील सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या. 

"ये मेरा भाई है, और..." चिमुकल्या भावाबहिणींचा जबरदस्त व्हायरल व्हिडिओ, त्या दोघांची स्टाइलच अशी की..

२. कुकरमध्ये पाणी टाका आणि ते तापवायला ठेवा. पाण्याला उकळी येऊ लागली की त्यात वरील सगळ्या भाज्या टाका. त्यानंतर त्यातच भिजवलेली तूर डाळ, पावभाजी मसाला आणि चवीनुसार तिखट- मीठ टाकावे. 

३. भाज्यांच्या साधारण १ इंच वर असेल, अशा बेताने पाणी टाकावे. कुकरचे झाकण लावून घ्या. ४ ते ५ शिट्ट्या होऊ द्या. त्यानंतर कुकर थंड झालं की भाज्या स्मॅश करून घ्या. वरतून लिंबू, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाका आणि बिनातेलाची चमचमीत पावभाजी बिंधास्त खा.

 

 

Web Title: How to make Pav bhaji without oil and butter, Tasty pav bhaji with no butter and no oil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.