पावभाजी हा अनेक जणांचा आवडीचा पदार्थ (recipe of pav bhaji). महिन्यातून एकदा किंवा काही जणं तर अगदी आठवड्यातून एकदा पावभाजीचा यथेच्छ आस्वाद घेत असतात. लहान मुलांचाही हा अगदी आवडता मेन्यू. त्यामुळे बऱ्याचशा वाढदिवसाच्या पार्ट्यांनाही पावभाजी (How to make Pav bhaji without oil and butter?) हमखास असतेच असते. शिवाय पावभाजीच्या माध्यमातून मुलांच्या पोटात सगळ्याच भाज्या जातात. त्यामुळे मुलांना पावभाजी देताना त्यांच्या आईही खूश असतात. आता या भाजीत भरपूर तेल आणि बटर असते शिवाय आपण ती मैद्यापासून तयार झालेल्या पावसोबत खातो, त्यामुळे अनेक हेल्थ कॉन्शस व्यक्ती पावभाजी (favorite food pav bhaji) खाणं टाळतात.
मैद्याच्या पावऐवजी आपण पोळी किंवा ब्राऊन ब्रेडचा विचार करू शकतो. पण तेल आणि तूप न वापरता केलेली पावभाजी, असाही काही पर्याय असतो, याचा आपण विचारच करत नाही. म्हणूनच तर ही बघा एक खास रेसिपी. या बिनातेलाच्या पावभाजीची रेसिपी इन्स्टाग्रामच्या kids.food.ideas.indian या पेजवर शेअर करण्यात आली आहे. तेल- तूप- बटर यांचा वापर न करताही चवदार पावभाजी कशी करता येते, ते बघूया.
कशी करायची बिनातेलाची पावभाजी?साहित्य२ कांदे, २ टोमॅटो, २ बटाटे, ३ सिमला मिरची, अर्धी वाटी चिरलेली पत्ताकोबी, अर्धी वाटी फ्लॉवर, तुम्हाला आवडणाऱ्या इतर भाज्या अर्धी ते पाऊण वाटी, २ टेबलस्पून पावभाजी मसाला, अर्धी वाटी भिजलेली तूर डाळ, चवीनुसार तिखट आणि मीठ.कृती१. वरील सगळ्या भाज्या बारीक चिरून घ्या.
२. कुकरमध्ये पाणी टाका आणि ते तापवायला ठेवा. पाण्याला उकळी येऊ लागली की त्यात वरील सगळ्या भाज्या टाका. त्यानंतर त्यातच भिजवलेली तूर डाळ, पावभाजी मसाला आणि चवीनुसार तिखट- मीठ टाकावे.
३. भाज्यांच्या साधारण १ इंच वर असेल, अशा बेताने पाणी टाकावे. कुकरचे झाकण लावून घ्या. ४ ते ५ शिट्ट्या होऊ द्या. त्यानंतर कुकर थंड झालं की भाज्या स्मॅश करून घ्या. वरतून लिंबू, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर टाका आणि बिनातेलाची चमचमीत पावभाजी बिंधास्त खा.