Join us  

१० मिनिटांत घरीच तयार करा पावभाजी मसाला, इतर भाज्यांमध्येही वापरा- चव येईल लय भारी, घ्या सोपी रेसिपी... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2023 2:33 PM

How To Make Pav bhaji Masala At Home?: सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांची पावभाजी मसाला तयार करण्याची साेपी रेसिपी एकदा बघून घ्या.... इतर भाज्यांमध्येही तुम्ही हा मसाला वापरू शकता (Easy recipe for making pav bhaji masala). 

ठळक मुद्देही रेसिपी सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना यांनी शेअर केली असून हा मसाला तयार करण्यासाठी अवघे १० मिनिटेही पुरेसे आहेत.

पावभाजी करायची असेल तर आपण विकत मिळणारा पावभाजी मसाला वापरतो. पण हा मसाला वापरूनही बऱ्याचदा पावभाजीची चव आपल्याला हवी तशी परफेक्ट जमून येत नाही (How to make street style pavbhaji at home). म्हणूनच आता घरी केलेल्या पावभाजीला विकतच्या पावभाजीसारखी अस्सल चव आणि सुगंध पाहिजे असेल तर हा एक मसाला घरीच तयार करा (Easy recipe for making pavbhaji masala). घरच्या घरी पावभाजी मसाला तयार करण्याची ही रेसिपी सेलिब्रिटी शेफ विकास खन्ना (Chef Vikas Khanna) यांनी शेअर केली असून हा मसाला तयार करण्यासाठी अवघे १० मिनिटेही पुरेसे आहेत.(How to make instant pavbhaji masala?)

 

पावभाजी मसाला तयार करण्याची रेसिपी

साहित्य

५ ते ६ वाळलेल्या लाल मिरच्या

२ टेबलस्पून धने

करिना कपूर ते खुशी कपूर... आयुष्यातल्या महत्त्वाच्या क्षणी आईचे- सासूचे कपडे घालणाऱ्या ६ सेलिब्रिटी..

६ लवंग

१ टेबलस्पून जीरे

दिड चमचा बडिशेप

दालचिनीचा २ इंचाचा तुकडा

४ विलायची

 

२ चमचे हळद

२ चमचे आमचूर पावडर

१ चमचा मीरेपूड

नेलपेंट लावली की एक- दोन दिवसांतच निघू लागते, १ सोपा उपाय- आठवडाभर नेलपेंट राहील जशास तशी...

१ चमचा काश्मिरी लाल तिखट

१ चमचा काळे मीठ

१ चमचा लाल तिखट

 

कृती

१. सगळ्यात आधी लाल मिरच्यांमधल्या बिया काढून घ्या आणि मध्यम आचेवर लाल मिरच्या गॅसवर ठेवून भाजून घ्या. मिरच्या भाजताना त्या जळणार नाहीत, याची मात्र काळजी घ्या.

२. त्यानंतर कढईमध्ये धने, लवंग, जिरे, बडिशेप, दालचिनीचे तुकडे आणि विलायची टाकून हे सगळं मिश्रणही मंद आचेवर भाजून घ्या.

थंड झालेला भात मायक्रोवेव्ह न वापरता गरम करण्याची सोपी ट्रिक- १ मिनिटात गरमागरम वाफाळता भात तयार..

३. मिरच्या आणि वरील मसाला थंड झाला की एकत्रितपणे मिक्सरच्या भांड्यात टाका.

४. यानंतर त्यामध्ये हळद, आमचूर पावडर, मीरेपूड, तिखट आणि काश्मिरी तिखट तसेच काळे मीठ टाका आणि सगळा मसाला एकत्रितपणे मिक्सरमधून बारीक करून घ्या.

५. मिक्सरमधून बारीक करताना एकदम जाेरात मिक्सर फिरवू नका. ३ ते ४ सेकंद फिरवा, पुन्हा बंद करा... असं मिक्सर चालू- बंद करत मसाला वाटून घ्या. मसाल्याची चव आणखी वाढेल. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स