शेंगदाण्याची चटणी (Peanut Chutney) एक स्वादीष्ट आणि पौष्टीक रेसिपी आहे. भारतीय जेवणात ही चटणी आवडीने खाल्ली जाते. प्रत्येक ऋतूत ही चटणी लोक जेवणासोबत खातात (Peanut Chuteny) शेंगदाण्याची चटणी तुम्ही कोणत्याहीवेळी बनवून खाऊ शकता. ही चटणी दुपारचं जेवण आणि रात्रीच्या जेवणाला केल्यास जेवणाची चव दुप्पट होईल. (How To Make Peanut Chutney Recipe Moongfali Ki Chutney)
शेंगदाण्याची सुकी चटणी बनवणं खूपच सोपं आहे. ही चटणी काही मिनिटांत बनून तयार होईल. शेंगदाण्याची चटणी तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीनं बनवू शकता. ही चटणी बनवण्याची सोपी रेसिपी पाहूया. (How To Make Peanut Chutney Recipe Moongfali Ki Chutney)
शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य
१) शेंगदाणे - १ कप
२) लाल मिरच्या - २ ते ३
३) जीरं - १ चमचा
४) आलं - १ इंच
५) लसणाच्या पाकळ्या - २ ते ३
६) हळद पावडर - अर्धा चमचा
७) लाल मिरची पावडर - अर्धा चमचा
८) हिंग - दीड चमचा
९) मीठ - चवीनुसार
शेंगदाण्याची सुकी चटणी करण्यासाठी लागणारं साहित्य
१) एका नॉन स्टिक पॅनमध्ये शेंगदाणे मध्यम आचेवर भाजून घ्या नंतर हलके गोल्डन होईपर्यंत, वास येईपर्यंत भाजा. त्याच पॅनमध्ये जीर, सुकी लाल मिरची पावडर घालून हलकं भाजून घ्या.
२) भाजलेले शेंगदाणे, जीरं, लाल मरीची पावडर, लसूण, हळद, हिंग आणि मीठ मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या जास्त बारीक वाटू नका. तयार आहे चविष्ट शेंगदाण्याची चटणी ही चटणी.
३) तुम्ही दही, पराठे, इडली, डोसा किंवा कोणत्याही इतर पदार्थांबरोबर खाऊ शकता. शेंगदाण्याची चटणी तुम्ही एअरटाईट डब्यात ठेवून फ्रिजमध्ये स्टोअर करू शकता.
४) चवीनुसार तुम्ही यात लिंबाचा रस घालू शकता, तसंच तुम्हाला फार तिखट आवडत असेल तर लाल मिरचीचं प्रमाण वाढवा.