उपवासाच्या दिवशी किंवा रोजच्या जेवणातही तोंडी लावणीसाठी चटण्या, वडी, भजी असे पदार्थ असतील तर जेवणाची मजाच वेगळी. सण उत्सवांच्या काळात ताटात वाढण्यासाठी किंवा नैवेद्यासाठी अळूवडी बनवली जाते. (Cooking Hacks) घरी बनवलेली अळूवडी परफेक्ट बनत नाही, कधी चण्याचं पीठ जास्त पातळ होतं तर कधी अळूवड्या फार तेल पितात. (How to make alu vadi)
अळू वड्या बनवायच्या म्हणजे पानं निवडण्यापासून तळेपर्यंत बऱ्याच लहान लहान गोष्टींची काळजी घ्यावी लागते. अनेकदा वड्या फसतात तर घरातील मंडळी आवडीने खातही नाहीत. तासनतास वेळ घालवून केलेले पदार्थ घरातल्यांनी खाल्ला नाही तर मूड ऑफ होतो ते वेगळंच. परफेक्ट अळूवड्यांची सोपी रेसिपी पाहूया. (Kitchen Tips)
साहित्य
१) अळूची पानं - १० ते १२
२)बेसनाचं पीठ- २ ते ३ वाटी
३) तांदळाचं पीठ - २वाटी
४) धणे- २ टिस्पून
५) जीरं- २ टिस्पून
६) आलं-लसणाची पेस्ट - २ टिस्पून
७) हिंग- १ टिस्पून
८) ओवा- अर्धा टिस्पून
९) हळद- एक टिस्पून
१०) लाल मसाला- २ टिस्पून
११) मीठ- चवीनुसार
१२) तेल- तळण्यासाठी
१३) तेलाचे मोहन ३ ते ४ चमचे
१४) चिंचाचे पाणी -१ कप
१५) गूळ - १ टिस्पून
कृती
१) अळूवडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी अळूची पानं व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर देठ काढून घ्या. देठ काढल्यानंतर लाटण्याने पानं सपाट करून घ्या. नंतर एका दुसऱ्या कढईत जीरं, धणे, भाजून घ्या आणि मिक्सरला फिरवून बारीक पावडर तयार करा. त्यानंतर कढईत बेसन पीठ, तांदळाचं पीठ घालून भाजून घ्या.
डोसा तव्याला चिकटतो? तव्यावर डोसा टाकण्याच्या सोप्या टिप्स, बनेल हॉटेलसारखा परफेक्ट डोसा
२) भाजलेलं पीठ एका मोठ्या ताटात काढा. त्यात धणे, जीऱ्याची पावडर, तीळ, हळद, तिखट, आलं-लसणाची पेस्ट, तेलाचं मोहन, चिंचेचं पाणी घाला. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव करा. त्यानंतर अळूच्या पानांना दोन्ही बाजूंनी व्यवस्थित लावून घ्या.
उकडीच्या मोदकांची पारी फुटते? न लाटता- न वळता करा मोदकाची ‘अशी’ परफेक्ट पारी
३) नंतर ही पानं फोल्ड करून गोलाकार कापून घ्या. या वड्या क्रिस्पी होईपर्यंत तेलात व्यवस्थित तळून घ्या. तयार आहेत गरमागरम अळूवड्या