Join us  

चिवडा होईल वातड की लाडूचा होईल दगड, विसरा टेंशन! परफेक्ट फराळासाठी १० टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2024 2:21 PM

Quick & Easy Tips To Make Perfect Faral At Home : Tips To Make Your Diwali Faral Superhit : How to make perfect and delicious faral at home for diwali : फराळाचे पदार्थ परफेक्ट जमण्यासाठी लक्षात ठेवा हे फराळमंत्र...

दिवाळी (Diwali 2024) आता अवघ्या काही दिवसांवर आली आहे. सगळ्याचं घरात दिवाळीचा फराळ करण्याची तयारी जोरदार सुरु असेलच. दिवाळीचा फराळ हे दिवाळीचे मुख्य आकर्षण असते. फराळातील प्रत्येक पदार्थ रुचकर आणि चविष्ट होण्यासाठी गृहिणी अगदी मन लावून फराळ करतात. रोजची काम, स्वयंपाक, घरातलं आवरुन फराळ बनवण्यासाठी थोडा वेळ राखून ठेवला जातो. फराळाच्या पदार्थातील एकही पदार्थ न बिघडता सगळे पदार्थ चवीला अगदी उत्तम होणे हे सोपे काम नसते(Quick & Easy Tips To Make Perfect Faral At Home).

कामाच्या गडबडीत किंवा वेळेअभावी काहीजणींना फराळ करायला पुरेसा वेळ नसतो, अशावेळी फराळ बाहेरुन विकत आणला जातो. परंतु आजही काही घरांमध्ये आपल्या पारंपरिक (Tips To Make Your Diwali Faral Superhit) पद्धतीने घरगुती फराळ केला जातो. फराळाचे पदार्थ चवीला रुचकर आणि स्वादिष्ट झाले तर खायलाही तितकीच मजा येते. एवढंच नाही तर फराळाचे सगळे पदार्थ चवीला उत्तम झाल्याने घरच्या गृहिणीला देखील आपली मेहेनत सार्थकी लागल्यासारखे वाटते. फराळ चविष्ट होण्यासाठी आपण आपल्या आजी, आईने सांगितलेल्या काही टिप्स फॉलो करतोच. फराळ अगदी परफेक्ट करणं हि एक कलाच आहे. यात जरासुद्धा गडबड झाली की संपूर्ण पदार्थच फसतो. असे होऊ नये म्हणून फराळ करताना काही सोप्या टिप्स लक्षात ठेवल्या तर फराळ न बिघडता चवीला रुचकर आणि चविष्ट होतो(How to make perfect and delicious faral at home for diwali).

फराळ करताना लक्षात ठेवाव्यात अशा टिप्स... 

१. चिवडा तयार करताना त्यामध्ये मीठ आणि साखर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे. हा उपाय केल्याने तळाशी राहिलेला चिवडा खारट होत नाही. 

२. शंकरपाळे करताना चपातीसारखी चार पदरी घडी करून त्यामध्ये तेलाऐवजी तूप लावून मैदा भुरभुरवून घ्यावा. यामुळे शंकरपाळ्यांना भरपूर लेयर्स येऊन त्या अधिक जास्त खुसखुशीत होण्यास मदत होते. 

३. करंजी करताना मैद्यामध्ये थोडसं मीठ आणि तुपाचे मोहन घालावे, यामुळे करंज्या चवीला अप्रतिम आणि खुसखुशीत होतात. 

परफेक्ट कुरकुरीत-खमंग बटाटा वडा करण्याासाठी लक्षात ठेवा ७ गोष्टी, गाड्यावरच्या वड्यापेक्षा भारी चव...

४. शेव तयार करताना त्यात हळद घालू नका हळद घातल्याने शेव लवकर नरम पडते. 

५. चकलीच्या पिठात हळद घातल्याने चकलीचा रंग काळपट होतो, याचबरोबर चकली मंद आचेवर तळावी यामुळे चकलीला अगदी परफेक्ट रंग येतो. 

६. अनारसे करताना पीठ जर घट्ट वाटत असेल तर त्यात दूध किंवा दही घालून पीठ मळून घ्यावे यामुळे पीठ मऊ होऊन अनारसे खुसखुशीत होतात. 

मुलांच्या डब्यांत देण्यासाठी पौष्टिक पराठ्यांचे ८ नवीन प्रकार, रोज नवीन हेल्दी खाऊ...

७. बेसन लाडू चांगले होण्यासाठी बेसन मंद आचेवर खमंग भाजून घ्यावे. त्यानंतर एक वाटी पीठाला एक चमचा याप्रमाणे दूध घालावे, यामुळे लाडूला खूप छान चव येते. 

८. कोणतेही तळणीचे पदार्थ करताना गॅस कमी जास्त करत रहावा. तेल जास्त थंड झाल्यास पदार्थ तेलकट होईल, जास्त गरम झाल्यास पदार्थ करपतो. 

९. बेसन लाडू करताना बेसन भाजून कोमट झाल्यानंतर त्यात थोडी मिल्क पावडर घालावी. बेसन लाडू अधिक चविष्ट होतात. 

१०. खारी शंकरपाळी करताना त्यात जिरे व मिरे कुटून घालावे म्हणजे शंकरपाळ्यांना खमंग सुवास येतो आणि चवीला देखील रुचकर लागतात.

टॅग्स :दिवाळी 2024अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.दिवाळीतील पूजा विधी