Join us  

बाजरीची भाकरी थापतानाच मोडते- तुकडे पडतात? ३ टिप्स- भाकरी होईल छान- फुगेल टम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2023 6:04 PM

3 Tips And Tricks For Making Perfect Bajra Bhakri: ज्वारीची भाकरी करणं बाजरीची भाकरी करण्यापेक्षा तुलनेनं अधिक सोपं आहे. म्हणूनच बाजरीची भाकरी करताना या काही गोष्टी लक्षात ठेवा...

ठळक मुद्देबाजरीची भाकरी न तुटता अगदी उत्कृष्ट कशी करायची, याच्या या काही टिप्स बघून घ्या..

वर वर पाहायला गेलं तर बाजरीची काय आणि ज्वारीची काय, दोन्हीही भाकरीच आहेत. त्यामुळे त्यांच्या करण्यात फार काही फरक पडत नसेल. किंवा एका पिठाची भाकरी करता आली, तर दुसऱ्या पिठाची भाकरीही अगदी आरामात करता येईल, असं वाटणंही अगदी साहजिक आहे. पण खरंतर असं नाही. कारण ज्वारीची भाकरी करणं हे बाजरीची भाकरी करण्यापेक्षा थोडं सोपं आहे. कारण बाजरीपेक्षा ज्वारीच्या पिठात जास्त चिकटपणा असतो. त्यामुळे ज्वारीची भाकरी करताना तुटत नाही. पण तेच बाजरीची भाकरी करताना तुटते शिवाय ती चांगली भाजून झाली तरी देखील तिचा तुकडा पडतो (How to make perfect Bajra bhakari?). म्हणूनच बाजरीची भाकरी न तुटता अगदी उत्कृष्ट कशी करायची, याच्या या काही टिप्स बघून घ्या..(healthy pearl millet roti)

 

बाजरीची भाकरी करण्यासाठी टिप्स१. बाजरीच्या पिठात चिकटपणा नसतो. त्यामुळे पीठ भिजवताना ते खूप घट्ट भिजवू नये, तसेच खूप सैलसरही असू नये.

कोवळ्या काकडीचं करा ‘ग्रीक कुकुंबर रायता’! ग्रीक चवीची ही कोशिंबिर सणावाराला करावी इतकी चविष्ट

तसेच बाजरीच्या भाकरीचे पीठ जरा जास्त मळावे. कारण जेवढे व्यवस्थित ते मळून घेऊ तेवढे ते एकजीव होण्यास मदत होईल आणि तुकडा पडणार नाही.

 

२. भाकरी थापण्यापुर्वी परातीमध्ये किंवा पोळवाटावर कोरड्या पिठाचा एक पातळसा थर द्या. त्यावर भाकरीचा उंडा ठेवा आणि भाकरी थापा.

केस खूपच चिकट झाले? करा १ सोपा उपाय- केस होतील सिल्की आणि चमकदार

भाकरी थापताना डाव्या हाताने तिच्या काठांना आधार द्या आणि उजव्या हाताच्या बोटांनी हळूवारपणे भाकरी थापा. यामुळे भाकरीचे काठ मोडणार नाहीत.

 

३. बाजरीची भाकरी खूप पातळ थापायला जाऊ नये. ती थोडी जाड असावी. भाकरी थापताना भाकरीचा जाे भाग खाली होता, तो भाग ती भाजत असताना सुरुवातीला वरच्या बाजुला असावा.

वजन झटपट कमी करायचं- बारीक व्हायचं म्हणून मुळीच करु नका ३ चुका, आहारतज्ज्ञांचा कळकळीचा सल्ला

त्या भागावर हलक्या हाताने पाण्याचा शिबका मारावा. पाणी खूप जास्त झाले, तरी भाकरी मोडू शकते. त्यामुळे भाकरीला ओलसरपणा येईल, एवढंच पाणी मारावं. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.