गरमागरम वाफाळती बिर्याणी म्हणजे अनेकांचा वीक पॉईंट. म्हणून घरातल्या बिर्याणी लव्हर्सला (biryani lovers) खुश करण्यासाठी आपण कधीतरी घरी बिर्याणी करण्याचा घाट घालतो. बिर्याणी विकतच्यासारखी अगदी परफेक्ट जमून येणं, ही काही चेष्टा नाही. कारण ती मोठ्या नजाकतीने करावी लागते (How to make perfect biryani?). एखाद्या पदार्थाचा स्वाद जास्त झाला किंवा कमी झाला तरी मग खाण्यात मजा येत नाही. बिर्याणी जमून येण्यासाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गॅस नेमका कधी बंद करायचा (When to off the gas while making biryani), याचं परफेक्ट टाइमिंग जमलं पाहिजे. त्याविषयीच तर खास सल्ला देत आहेत सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर ( Kunal Kapur).
बिर्याणी करत असताना तांदूळ, भाज्या आणि इतर मसाल्यांचे प्रमाण आपण अगदी अचूक घेतो. बिर्याणी शिजायला ठेवेपर्यंत सगळं काही परफेक्ट चालू असतं. पण कुकरमध्ये बिर्याणी लावल्यानंतर गॅस नेमका कधी बंद करायचा, हेच लक्षात येत नाही.
प्रीती झिंटाला लागला गाडगी- मडकी बनवण्याचा नवा छंद, मातीत हात घालण्याचा आनंद- व्हायरल व्हिडिओ
बऱ्याच जणीचं नेमकं इथेच अडतं. त्यामुळे मग एक तर बिर्याणी कच्ची राहते, तिला स्वाद येत नाही. नाहीतर मग ती खाली कुकरच्या तळाला लागते आणि तिला जळका वास येतो. असं होऊ नये आणि अगदी हॉटेलसारखी परफेक्ट बिर्याणी जमावी, यासाठी कुणाल कपूर यांचा हा छोटासा उपाय करून बघा.
बिर्याणी परफेक्ट शिजली हे कसे ओळखायचे?
जेव्हा बिर्याणी कुकरमध्ये लावली असेल तेव्हा जिथून वाफ येते त्या कुकर आणि त्याचं झाकण या गॅपमध्ये एक रुमाल लावा. ८ ते १० सेकंद रुमाल तिथे धरून ठेवा. नंतर त्याचा वास घेऊन बघा.
डाळिंब खा पण साल फेकून देऊ नका, २ भन्नाट उपयोग- लालचुटूक डाळिंब म्हणजे त्वचेसाठी वरदान
त्याला जर बिर्याणीचा सुगंध येत असेल, तर बिर्याणी परफेक्ट शिजली आहे. मसाल्यांचा जर उग्र वास आला, तर बिर्याणी खाली लागते आहे हे लक्षात घ्या आणि लगेच गॅस बंद करा.