थंडीच्या दिवसात गरमागरम चहा (Tea) पिण्याचा आनंद काही वेगळाच. (Tapri Style Tea Making) एकदा चहा प्यायला की सतत पित राहावासा वाटतो पण घरी बनवलेला चहा कधी पांचट होतो तर कधी जास्त गोड तर कधी सर्व मटेरिअल घालूनही चहाला हवी तशी चव येत नाही. (Chai Recipe in Marathi) चहा हा कॉमन पदार्थ असला तरी ऑफिसच्या चहाची चव, टपरीवरच्या आणि घरच्या चहाची चव ही वेगळीच असते. चहाच्या टपरीवर मिळतो तसा परफेक्ट चहा करण्यासाठी तुम्हाला काही बेसिक स्टेप्स लक्षात ठेवाव्या लागतील. (How to make Perfect Chai)
परफेक्ट चहा करण्याची सोपी पद्धत (Chaha Karnyachi Recipe in Marathi)
1) सगळ्यात आधी चहाच्या भांड्यात २ ते ३ कप पाणी घाला. गॅस ऑन करून पाण्याला व्यवस्थित उकळू येऊ द्या. जर तुम्ही पाणी उकळ्याआधीच मसाले किंवा घातले तर चहा कडवट होऊ शकतो. नंतर खलबत्यात आलं बारीक कुटून घ्या यामुळे त्यातला रस बाहेर येईल. त्यात २ वेलची, २ ते ३ लवंग घाला, लवंगाबरोबर तुम्ही २ ते ३ काळ्या मिरीचे दाणेही घालू शकता.
थंडीत रोज चपातीबरोबर १ गुळाचा खडा खा, हाडं होतील बळकट-हिमोग्लोबिन भरपूर वाढेल
2) मसाला व्यवस्थित बारीक केल्यानंतर पाण्यात घालून २ ते ३ मिनिटं उकळून घ्या. तुम्ही हवं तर आलं किसूनही घालू शकता. पाणी फ्लेवरयुक्त झाल्यानंतर लगेच दूध घाला. दूध पाण्यात मिसळल्यानंतर पुन्हा उकळून घ्या. ही टपरीवर चहा विकणाऱ्यांची सोपी ट्रिक आहे. यामुळे चहाला क्रिमी टेक्स्चर येते.
3) दूध ढवळत राहा आणि थोडं फार आटवून घ्या. दूध क्रिमी झाल्यानंतर त्यात २ ते ३ टिस्पून साखर घाला. साखर सुरूवातीला किंवा शेवटी घालू नका यामुळे चहाची चव बदलू शकते. साखर वितळेपर्यंत दूध ढवळत राहा. नंतर यात ४ ते ५ चमचे चहा पावडर घाला. चहा ढवळल्याने चहाचा टेक्सचर बिघडत नाही.
उरलेल्या भाताचा करा क्रिस्पी-टेस्टी डोसा; ५ मिनिटांत बनेल डोसा-फोडणीचा भात करणंच विसराल
4) उकळ आल्यानंतर लो मिडीयम फ्लेमवर ठेवा. चहावर पातळ मलई आल्यानंतर गॅस बंद करा. त्यानंतर चहा किटली किंवा बंद भांड्यात गाळून घ्या. गाळल्यानंतर गरमागरम चहा चहाच्या कपात भरा. फक्कड असा चहा तुम्ही बन मस्का, टोस्ट, खारी आणि बिस्किट्स कशाही बरोबर खाऊ शकता.