केक हा अगदी लहान मुलांपासून - मोठ्यांपर्यंत अनेकांना आवडतो. वाढदिवस, अॅनिव्हर्सरी किंवा एखाद्या खास प्रसंगी हमखास केक कापला जातो. केकचे आपल्याला अनेक प्रकार पाहायला मिळतात.(cake without oven) अगदीच त्यामध्ये वेगवेगळ्या फ्लेव्हरची टेस्ट देखील घेता येते.
केक बनवताना अनेकदा तो चुकतो किंवा फसतो. त्यामुळे आपल्याला तो पुन्हा ट्राय करावा असे वाटतं नाही. घरी बनवण्यापेक्षा बाहेर विकत आणून खाल्लेला केव्हाही चांगला.(How to make choco lava cake without oven step by step) केक बनवण्यासाठी त्याची प्रोसिझर आपल्याला नीट समजली की, आपण तो सहज बनवू शकतो. (Choco lava cake recipe without microwave or oven)अनेकदा मुले आपल्यालाकडे घरी बनवण्याचा हट्ट करतात. अशावेळी नेमके काय करावे आपल्याला सुचत नाही.(Lava cake without egg) बाजारात मिळणारा केक घरीच बनवायचा असेल तर या सोप्या टिप्स लक्षात ठेवा. (Easy choco lava cake recipe)
खुसखुशीत खमंग बाकरवडी करा घरीच! उन्हाळी सुट्टीत मुलांसाठी स्पेशल खाऊ करा मुलांच्याच मदतीने!
पेस्टी, कपकेक्स, मफिन्स, क्रिम केक आपण खाल्लेच असतील. आजकाल या गोष्टींची चव ही आपल्याला चाखायला मिळते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु आहेत. अशावेळी मुलांना सतत गोड खावेसे वाटते. चॉकलेट हा मुलांच्या आवडीचा पदार्थ आणि त्याक केक म्हटलं तर अगदी चवीने खातात. मुलांसाठी घरच्या घरी चोको लाव्हा केक तयार करु शकता, तेही अर्ध्या तासात. अगदी विकतचा मिळणाऱ्या केकसारखा लागेल. यासाठी आपल्याला ओव्हनची गरजही भासणार नाही. सोपी झटपट रेसिपी कशी बनवायची पाहूया.
साहित्य
ओरीओ बिस्किट - ३ पॅकेट
दूध - १ कप
बेकिंग सोडा - १/४ चमचा
बेकिंग पावडर - १/२ चमचा
चॉकलेट
बटर पेपर
कृती
1. केक तयार करण्यासाठी सगळ्यात आधी बिस्किटाचा चुरा करुन घ्या. त्यामध्ये कपभर दूध घालून चांगले फेटून घ्या.
2. आता त्यात बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालून पुन्हा मिक्स करा.
3. मिश्रण जर जास्त जाडसर असेल तर त्यात दूध घालून पुन्हा फेटून घ्या.
4. आता केक बनवण्यासाठी स्टीलची वाटी घेऊन त्याच आकाराचा बटर पेपर कापून त्यात घाला. त्यावर तयार मिश्रण पसरवून चॉकलेट्स घाला. आता वरुन पुन्हा केकचे मिश्रण घाला.
5. कढई तापत ठेवून त्याच्या आत स्टॅण्ड ठेवा. त्यावर केकच्या मिश्रणाची वाटी ठेवा. २० मिनिटानंतर तपासून पाहा. तयार होईल. चॉको लाव्हा केक.