Join us  

खाेबऱ्याची हिरवीगार चटणी! इडलीपासून पराठ्यापर्यंत कशासोबतही खा एकदम टेस्टी, शेफ कुणाल कपूर सांगतात झटपट रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 05, 2022 3:59 PM

Food And Recipe: खोबऱ्याची चटकदार हिरवी चटणी करण्याची ही परफेक्ट रेसिपी (coconut chutney recipe)... अवघ्या ७ ते ८ मिनिटांत चटणी तयार..

ठळक मुद्दे उत्तम चवीची खोबऱ्याची हिरवी चटणी अगदी झटपट तयार..

दक्षिण भारतात किंवा आपल्याकडच्या टिपिकल साऊथ इंडियन रेस्टॉरंट्समध्ये इडली, डोसा यांच्यासोबत खोबऱ्याची एक हिरवट रंगाची चटणी ( Green coconut chutney recipe) दिली जाते. आपल्याकडे जे इडलीचं रेडिमेड पीठ मिळतं, त्यासोबतही अनेकदा अशी चटणी देतात. हिरव्या रंगाची दिसणारी ही चटणी खरोखरंच अतिशय चवदार असते. आपण एरवी जी घरी चटणी (South Indian style coconut chutney) करतो, त्या घरच्या चटणीला विकतच्या नारळाच्या चटणीची चव येतच नाही. म्हणूनच तर ही बघा सेलिब्रिटी शेफ कुणाल कपूर ( coconut chutney recipe by cheff Kunal Kapur) यांची ही खास रेसिपी. उत्तम चवीची खोबऱ्याची हिरवी चटणी अगदी झटपट तयार..

 

खोबऱ्याची चटणी करण्याची रेसिपीसाहित्य२ वाटी किसलेलं खोबरं, पाऊण वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, २ टेबलस्पून भाजलेली हरबऱ्याची डाळ, २ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून किसलेलं आलं, १ टीस्पून उडीद डाळ, फोडणीसाठी तेल, २ हिरव्या मिरच्या, मोहरी, १ टेबलस्पून चिंचेचा कोळ, कढीपत्त्याची ७ ते ८ पानं, हिंग, चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर. 

महालक्ष्मी विसर्जनाला नैवैद्य दहीभातच का करतात? दहीभात खाण्याचे ५ फायदे, पारंपरिक आहाराचे महत्त्व 

रेसिपी १. सगळ्यात आधी गॅसवर एक कढई ठेवा आणि त्यात हरबरा डाळ टाकून भाजून घ्या. तसेच चिंचेचा कोळ करून ठेवा.

२. कढईतली डाळ काढून घ्या. त्यात आता अर्धा टेबलस्पून तेल टाका. तेल गरम झालं की खोबरं आणि काेथिंबीर दोन्ही एकत्रच कढईत टाकून परतून घ्या. खोबरं खूप लालसर होईपर्यंत परतू नका. 

 

३. यानंतर परतून घेतलेलं खोबरं आणि कोथिंबीर, हरबरा डाळ, चिंचेचा कोळ, हिरव्या मिरच्या, आलं मिक्सरच्या भांड्यात टाका आणि त्याची बारीक पेस्ट करून घ्या.

४. ही चटणी एका बाऊलमध्ये काढा. त्यात चवीनुसार मीठ आणि चिमुटभर साखर टाका.

५. एका छोट्या कढईत तेल, उडीद डाळ, मोहरी, हिंग, लाल मिरच्या, कढीपत्ता टाकून फोडणी करून घ्या. ही फोडणी चटणीत टाकली की चटकदार चटणी झाली तयार. 

 

टॅग्स :अन्नपाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.कुणाल कपूर