Join us  

डोसा क्रिस्पी होत नाही-तव्याला चिकटतो? परफेक्ट डोसा करण्याच्या ३ ट्रिक्स, डोसा करा झटपट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2024 2:56 PM

How To Make Perfect Crispy Dosa : डोसा करण्यासाठी लागणारं बेसिक साहित्य माहित करून घ्या आणि व्हिडिओत दाखवलेल्या स्टेप्सनुसार डोसा बनवण्याची तयारी करा.

सकाळच्या नाश्त्याला किंवा दुपारच्या जेवणाला खाण्यासाठी साऊथ इंडियन पदार्थ उत्तम पर्याय आहे. (Cooking Tips) इडली, डोसा हे पदार्थ पचायला हलके असतात आणि सतत खावेसे वाटतात. नेहमी नेहमी बाहेरून डोसा ऑर्डर करणं शक्य नसतं अशावेळी जर तुम्हाला घरच्याघरी डोसा बनवता आला तर सगळेच आवडीने खातील. (How To Make Dosa At Home)

घरी बनवलेला डोसा कुरकुरीत होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. (How To Make Crispy Masala Dosa At Home) डोसा करण्यासाठी लागणारं बेसिक साहित्य माहित करून घ्या आणि व्हिडिओत दाखवलेल्या स्टेप्सनुसार डोसा बनवण्याची तयारी करा. (Dosa Making tips)

डोसा करण्यासाठी लागणारं साहित्य (Dosa Making Ingredients) 

१) २ ग्लास भात

२) १ ग्लास उडीदाची डाळ

३) ३ टेबलस्पून चण्याची डाळ

४) १ टेबलस्पून मेथीचे दाणे

५) चवीनुसार मीठ

डोसा करण्याची सोपी ट्रिक (How To Make Dosa Trick's)

१) सगळ्यात याधी एका भांड्यात १ ग्लास तांदूळ घाला, १ ग्लास उडीदाची डाळ घाला, ३ टेबलस्पून चण्याची डाळ घाला. पाण्याने ३ वेळा धुवून घ्या. त्यात पाणी घालून काही वेळासाठी झाकून ठेवा. उडीदाची डाळ आण तांदूळ घ्या एका मोठ्या बाऊलमध्ये  चार कप तांदूळ आणि कप  उडीदाची डाळ चार तास भिजवून ठेवा.

कॅल्शियम हवयं पण दूध नको? दुधापेक्षा ४ पट जास्त कॅल्शियम देतात ५ पदार्थ, हाडं होतील बळकट

2) सर्व साहित्य वेगवेगळे वाटून ही पेस्ट एका मोठ्या भांड्यात काढा. एका छोट्या बाऊलऐवजी मोठ्या भांड्यात काढा. अन्नाला पाणी शोषण्यासाठी पुरेशी जागा असेल याची खात्री करा. डोश्याचं पीठ जास्त जाड किंवा पातळ असू नये. हे बॅटर एका चमच्याने ढवळून घ्या. 

3) एका छोट्या वाटीत मेथीचे दाणे भिजवून ठेवा.  ३ ते ४ तास भिजवल्यानंतर डाळ तांदूळ आणि मेथीचे दाणे मिक्सरच्या भांड्यात घालून दळून घ्या. दळलेलं पीठ ७ ते ८ तासांसाठी भिजवून ठेवा.

सुटलेलं पोट-जाडजूड मांड्या कमीच होत नाही? ‘या’ बिया १ ग्लास पाण्यात घालून प्या!

4) १ ते २ चमचे मीठ घाला. पीठ आंबवून तयार झाल्यानंतर नॉनस्टिक पॅन गरम करून घ्या. त्यावर तेल लावून डोश्याचे पीठ तव्यावर व्यवस्थित पसरवून घ्या. डोसा कुरकुरीत होईपर्यंत शिजवून घ्या. 

5) त्यावर तूप घालून चमच्याच्या साहाय्याने डोसा फोल्ड करून घ्या. तयार आहे गरमागरम कुरकुरीत डोसा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न