Join us  

How to Make Perfect Dahi at Home : मलईदार, ताज्या , घट्ट दह्यासाठी वापरा ८ ट्रिक्स; ३ तासांच्या आत तयार होईल वड्या पडतील असं दही

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2022 1:06 PM

How to Make Perfect Dahi at Home : घरी दही कसे बनवायचे आणि दही घट्ट करण्यासाठी टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही घरच्याघरी घट्ट, मलईदार दही बनवू शकता

(Image Credit- Ruchiskitchen.com)

दही बाजारात सहज उपलब्ध होते. पण जर तुम्ही आरोग्याबाबत खूप जागरूक असाल आणि शुद्ध दही खायचे असेल तर तुम्ही घरीही दही बनवू शकता. (How to make curd at home) घरी बनवलेलं दही स्वस्त आणि चवदार असतं आणि थोडे प्रयत्न केले तर ते घट्टही होऊ शकते. (Cooking Tips) या लेखात तुम्हाला घरी दही कसे बनवायचे आणि दही घट्ट करण्यासाठी टिप्स सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही घरच्याघरी घट्ट, मलईदार दही बनवू शकता. (Ways to make creamy homemade curd  in less time)

१) आधीच्या दह्यापासून दही लावा

दही बनवण्याची ही सर्वात सोपी पद्धत आहे. यासाठी थोडे जुने आंबट दही ठेवणे आवश्यक आहे, त्याच्या मदतीने नवीन दही सेट केले जाईल. दूध चांगले उकळवा. नंतर ते थंड करा. कोमट झाल्यावर त्यात काही चमचे जुने दही घाला. त्यानंतर रात्रभर किंवा 7-8 तास गोठण्यासाठी ठेवा.

२) ओव्हनमध्ये दही बनवा

जर तुमच्याकडे दही सेट करायला कमी वेळ असेल तर तुम्ही  ओव्हनची मदत घेऊ शकता. यासाठी भांड्यात काही चमचे दही ठेवा आणि गरम केल्यानंतर थंड केलेले दूध घाला. मायक्रोवेव्ह 180 अंशांवर 2 मिनिटे प्रीहीट करा. नंतर हे दुधाचे-दह्याचे भांडे बंद करून ठेवा. अशा प्रकारे दही ३-४ तासात गोठते.

३) लाल मिरची

तुमच्याकडे सेट करण्यासाठी आधीचं दही नसेल, तरीही तुम्ही दही गोठवू शकता. यासाठी दूध उकळवा आणि थंड होऊ द्या. नंतर त्यात ३-४ सुक्या लाल मिरच्या घाला. दही ८-९ तासांत गोठते. यामुळे गोठलेले दही फार घट्ट होत नाही, तरीही दही गोठते. नंतर त्या दह्यापासून नवीन घट्ट दही बनवता येते. 

४) दूध चांगलं उकळंवून घ्या

घरी दही बनवताना, लोक प्रथम दूध उकळतात (200 डिग्री फॅरेनहाइट तापमानात), नंतर ते थंड करतात आणि त्यात थोडे आंबट दही घालतात. पण जर तुम्हाला तुमचे दही खूप घट्ट आणि मलईदार बनवायचे असेल, तर तुम्हाला 200 डिग्री फॅरेनहाइटवर 20 मिनिटे दूध उकळवावे लागेल. ही वेळ दुधाच्या प्रमाणानुसार वाढवता येते. यामुळे दुधात असलेली आर्द्रता कमी होते आणि जे उरते ते  घट्ट स्वरूपात असते. अशा प्रकारे दूध शिजवल्यानंतर दही सेट केल्यास ते सामान्य दह्यापेक्षा जास्त घट्ट होईल.

५) दही सेट होण्यासाठी पुरेसा वेळ द्या

बरेच लोक म्हणतात की, दही गोठल्याबरोबर थंड ठिकाणी ठेवावे किंवा ते वापरावे. दही जास्त काळ ठेवल्यास ते आंबट होते. तर दही जास्त काळ ठेवल्याने घट्ट होते. साधारणपणे ते सेट होण्यासाठी किमान 7 तासांचा वेळ द्यावा.

  उन्हामुळे नीट भूकही लागत नाही, कमी खाल्लं तरी पोट फुगतं? ५ उपाय,  पोटाचे त्रास कायमचे राहतील लांब

६) गाळून घ्या

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या दह्यामध्ये जास्त पाणी आहे, तर तुम्ही यासाठी फिल्टरिंग पद्धत वापरू शकता. ग्रीक योगर्ट असेच केले जाते. तुम्ही ते  कोणत्याही प्रकारे फिल्टर करू शकता. जेवढे घट्ट दही हवे तेवढे ते गाळून घेता येते.

७) मिल्क पावडर मिसळा

दुधात फुल क्रीम नसेल तर घट्ट दही सेट करणे थोडे कठीण काम आहे. अशा स्थितीत दूध उकळण्यापूर्वी त्यात थोडी दुधाची पावडर मिसळा. त्याच्या मदतीने तुमचे दही खूप घट्ट होऊ शकते.  त्यात फक्त काही चमचे दूध पावडर घाला, जास्त नाही.

८) जिलेटिन

स्वयंपाकघरात जिलेटिन असेल तर तुमचे दही नक्कीच घट्ट होईल. होय, जिलेटिनच्या मदतीने दही घट्ट आणि मलईदार बनवता येते. सुरुवातीला, प्रयोग म्हणून अर्धा ते एक चमचे जिलेटिन घाला. प्रथम जिलेटिन थोड्या दुधात मिसळा, भिजू द्या. नंतर उरलेले दूध तापायला लागल्यावर दूधात जिलेटिन वापरा आणि ते दूध दही लावण्यासाठी वापरा. 

टॅग्स :अन्नपाककृती