रोजच्या नाश्त्याला काय बनवावं हा घरोघरच्या महिलांपुढे सगळ्यात मोठा प्रश्न असतो. पोहे, उपमा, चपाती खाऊन कंटाळा येतो. नाश्त्याला काहीतरी वेगळं, चविष्ट खाण्याची इच्छा अनेकांची होते. डोसे किंवा इडली बनवायचं म्हटलं तरी ती हवी तशी बनत नाही. (Instant dosa Recipe) थंडीच्या दिवसात पीठ आंबायला बराचेळ लागतो. रात्रभर भिजवूनही पीठ हवंतसं फुलून येत नाही. तर कधी डोसे तव्याला चिकटतात. कधी प्लेन दिसतात. सॉफ्ट, कुरकरीत जाळीदार डोसा बनवण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (How to make Instant dosa)
साहित्य
भिजवलेले तांदूळ - १ कप
किसलेलं नारळ - १ कप
पाणी- गरजेनुसार
ड्राय यीस्ट - १ चमचा
साखर - १ चमचा
मीठ - चवीनुसार
१) डोसे बनवण्यासाठी सगळ्यात आधी मिक्सरचं भांडं घ्या. त्यात भिजवलेले तांदूळ दळून घ्या. तांदूळ पातळसर दळून घेतल्यानंतर एका पॅनमध्ये ते शिजवून घ्या हे मिश्रण घट्ट झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढा.
२) त्यात साखर, मीठ, ड्राय यीस्ट घालून मिश्रण थोडावेळ झाकून ठेवा. मिश्रण व्यवस्थित फुलल्यानंतर त्याचे छान डोसे काढून घ्या. हे डोसे खायला चविष्ट आणि बनवायला अगदी सोपे आहेत.