घरात इडली किंवा डोसा बनवायचं म्हटलं की पदार्थ व्यवस्थित बनेल की नाही याची चिंता असते. कारण डाळ तांदूळ भिजवण्यापासून तव्यावरून डोसा काढेपर्यंत अनेक गोष्टींची काळजी घ्यावी लागते. यातील एक जरी स्टेप चुकली तर डोसा व्यवस्थित बनत नाही. (How to Make Perfect Dosa Batter at Home) डोश्याचं पीठ फुलत नाही, डोसे तुटतात. अशी अनेकांची तक्रार असते. डाळ तांदूळ दळताना काही सोप्या टिप्स वापरल्या तर हॉटेल्स्टाईल डोसा घरीच बनू शकेल. (How to make dosa batter at home)
१) डोसा बनवण्यासाठी सगळ्यात आधी उडीदाची डाळ ७ ते ८ तासांसाठी भिजवायला ठेवा. नंतर डाळीतलं पाणी उपसून ती डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्या. डाळ वाटताना त्यात जास्त पाणी घालू नका. गरजेनुसार थोडच पाणी घाला. नंतर ७ ते ८ तास भिजवलेले तांदूळ आणि मेथीचे दाणे आणि चण्याची डाळ मिक्सरमधून बारीक वाटून घ्या. चण्याची डाळ ऑपश्नल असली तरी चण्याची डाळ वाटून घातल्यामुळे डोशाला चांगला रंग येतो.
२) सगळे पदार्थ वाटल्यानंतर एका बाऊलमध्ये काढून घ्या आणि हाताने व्यवस्थित एकाच दिशेने फेटून घ्या. फेटलेले मिश्रण ९ ते १० तासांसाठी एखाद्या ठिकाणी झाकून ठेवा. १० तासांनी पीठ व्यवस्थित आंबलेलं तुम्हाला दिसून येईल. त्यात गरजेनुसार मीठ घालून मिश्रण पुन्हा एकजीव करून घ्या.
३) नॉन स्टिक तव्याला तेल लावून व्यवस्थित तेल लावून डोसा पसरवून घ्या. डोसा पसरवल्यानंतर त्यावर तेल घाला. त्यानंतर तुम्हाला डोसा जितका क्रिस्पी हवा आहे त्यानुसार शिजवून घ्या. त्यानंतर डोसा व्यवस्थित रोल करून घ्या.
डोश्याचं बॅटर व्यवस्थित फुलण्यासाठी टिप्स
१) डोसा बनवण्यासाठी तुम्ही डाळ, तांदूळ भिजवताना मोठ्या भांड्याचा वापर करा. लहान भांड्यात पाणी कमी राहतं. त्यामुळे डाळ किंवा तांदूळ कोरडे पडू शकतात. जास्त लोकांसाठी बॅटर तयार करायचं असेल मोठ्या भांड्याचा वापर करा.
२) डोसा बॅटर जास्त पातळ किंवा जास्त जाड असू नये त्याची कंसिस्टंससी मध्यम असावी. डोसा बॅटर बनवताना एकदम तव्याच्या कडेपर्यंत पसरवू नये, कडेला थोडी जागा ठेवा जेणेकरून डोसा काढताना तुटणार नाही.
३) विकसारखा डोसा बनवायचा असेल तर पीठ व्यवस्थित आंबवणं गरजेचं आहे. कमीत कमी ६ ते ८ तासांसाठी पीठ गरम जागेवर ठेवा.
४) डोसा तव्यावर घालण्याआधी थंड पाणी शिंपडा जेणेकरून डोसा चिकटणार नाही आणि क्रिस्पी डोसा तयार होईल.