Lokmat Sakhi >Food > नाश्त्याला झटपट करा मस्त गुजराथी स्पॉंजी खमण ढोकळा; विकतसारखा ढोकळा बनेल घरीच...

नाश्त्याला झटपट करा मस्त गुजराथी स्पॉंजी खमण ढोकळा; विकतसारखा ढोकळा बनेल घरीच...

How To Make Perfect Gujrati Style Khaman Dhokla Recipe : कधी ढोकळा एकदम कडक होतो तर कधी एकदम बसल्यासारखा होतो आणि कच्चट राहतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2023 03:46 PM2023-06-05T15:46:56+5:302023-06-05T15:48:11+5:30

How To Make Perfect Gujrati Style Khaman Dhokla Recipe : कधी ढोकळा एकदम कडक होतो तर कधी एकदम बसल्यासारखा होतो आणि कच्चट राहतो.

How To Make Perfect Gujrati Style Khaman Dhokla Recipe : Make breakfast quick with delicious Gujarati style spongy khaman dhokla; Dhokla will be made at home... | नाश्त्याला झटपट करा मस्त गुजराथी स्पॉंजी खमण ढोकळा; विकतसारखा ढोकळा बनेल घरीच...

नाश्त्याला झटपट करा मस्त गुजराथी स्पॉंजी खमण ढोकळा; विकतसारखा ढोकळा बनेल घरीच...

रोज उठून नाश्त्याला काय करायचं असा प्रश्न आपल्याला पडतो. सतत पोहे, उपमा असं खाऊन अनेकदा आपल्याला कंटाळाही येतो. अशावेळी इंस्टंट, चविष्ट असं काही करता आलं तर? पण सकाळी खूप घाई असल्याने आपल्याला कमी वेळात होणारे पदार्थ हवे असतात. त्यातही हे पदार्थ प्रोटीन देणारे आणि चविष्ट असतील तर मग नाश्त्याचा प्रश्नच मिटला. याशिवाय अनेकदा पाहुणे आल्यावरही आपल्याला पटकन काय करायचं असा प्रश्न पडतो. मग आपण बाहेरुनच सामोसा, ढोकळा किंवा वडे असं काहीतरी आणतो. पण अशावेळी आपण स्पॉंजी, जाळीदार छान ढोकळा केला तर पाहुणेही खूश होतात आणि आपल्यालाही वेगळं काहीतरी केल्याचा आनंद मिळतो. गुजरातचा स्पेशल असलेला खमण ढोकळा आपण अनेकदा ट्राय करतो. पण कधी तो एकदम कडक होतो तर कधी एकदम बसल्यासारखा होतो आणि कच्चट राहतो. पाहूयात हा ढोकळा नेमका कसा करायचा (How To Make Perfect Gujrati Style Khaman Dhokla Recipe)...

साहित्य - 

१. पाणी - २ कप 

२. मीठ - अर्धा चमचा 

३. साखर - १ चमचा 

(Image : Google)
(Image : Google)

४. लिंबाचा रस - १ चमचा 

५. तेल - २ चमचे

६. बेसन पीठ - २ ते ३ वाट्या

७. इनो - १ पाकीट 

कृती - 

१. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये मीठ, साखर, लिंबाचा रस आणि तेल घालावे. 

२. या सगळ्या गोष्टी पाण्यात एकजीव करुन घ्याव्यात.

३. त्यानंतर या पाण्यावरच चाळणी धरुन त्यात बेसनाचे पीठ चाळून घ्यावे. 

४. बिटरने हे पीठ चांगले एकजीव करुन घ्यावे.


५. यामध्ये इनो घालून पीठ पुन्हा एकाच दिशेने भरपूर हलवून घ्यावे.

६. मग एका भांड्यात तेल लावून त्यामध्ये हे पीठ ओतावे.

७. कुकरमध्ये पाणी घालून, कुकरची डीश ठेवून त्यावर हे भांडे १५ मिनिटांसाठी ठेवावे. 

८. नंतर हा ढोकळा काढून तेल, मोहरी, हिंग, जीरे, मिरच्या, कडीपत्ता, तीळ घालून खमंग फोडणी करावी आणि त्यात पाणी घालून ढोकळ्यावर ही फोडणी सगळीकडून घालावी. 

९. गरमागरम ढोकळ्यावर बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर आणि ओलं खोबरं घालावं आणि खायला घ्यावा.   

Web Title: How To Make Perfect Gujrati Style Khaman Dhokla Recipe : Make breakfast quick with delicious Gujarati style spongy khaman dhokla; Dhokla will be made at home...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.