Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घ्या खास रेसिपी - ५ सोप्या टिप्स - इडल्या होतील हलक्या - स्पोंजी

पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घ्या खास रेसिपी - ५ सोप्या टिप्स - इडल्या होतील हलक्या - स्पोंजी

5 Tips For Perfect Idli Batter: हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात इडलीचं पीठ व्यवस्थित आंबत नाही. त्यामुळे मग इडल्या मऊ होऊन चांगल्या फुगत नाहीत. त्यासाठीच बघा या काही खास टिप्स.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2022 05:26 PM2022-09-15T17:26:06+5:302022-09-15T17:27:00+5:30

5 Tips For Perfect Idli Batter: हिवाळ्यात किंवा पावसाळ्यात इडलीचं पीठ व्यवस्थित आंबत नाही. त्यामुळे मग इडल्या मऊ होऊन चांगल्या फुगत नाहीत. त्यासाठीच बघा या काही खास टिप्स.

How to make perfect idli “batter” at home for pillowy soft idli? | पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घ्या खास रेसिपी - ५ सोप्या टिप्स - इडल्या होतील हलक्या - स्पोंजी

पावसाळ्यात इडलीचं पीठ फुगतच नाही? घ्या खास रेसिपी - ५ सोप्या टिप्स - इडल्या होतील हलक्या - स्पोंजी

Highlights इडलीचं पीठ परफेक्ट व्हावं, यासाठी या बघा काही खास टिप्स आणि स्पेशल रेसिपी.

इडली सांबार किंवा इडली चटणी हा अनेकांचा आवडीचा पदार्थ. सकाळी नाश्त्याला गरमागरम इडल्या (how to make idli batter?) असल्या की खाणारे सगळेच खुश. यातही घरी पीठ भिजवून इडली केली की तिची चव आणखीनच खास लागते. पण पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात इडलीचं पीठ व्यवस्थित आंबत नाही. त्यामुळे मग इडल्या छान फुगत (how to make sponji idli?) नाही. मऊ होत नाहीत. म्हणूनच इडलीचं पीठ परफेक्ट व्हावं, यासाठी या बघा काही खास टिप्स आणि स्पेशल रेसिपी.

 

इडलीसाठी परफेक्ट पीठ कसं तयार करायचं?
१. ४ कप तांदूळ, १ कप उडीद डाळ, पाऊण टी स्पून मेथीचे दाणे अशा प्रमाणात इडलीसाठी डाळ- तांदूळ घ्यावेत. या प्रमाणात काही कमी जास्त झाले तर त्याचाही परिणाम इडलीच्या मऊसूतपणावर होऊ शकतो. हे सगळं साहित्य २ ते ३ वेळेस व्यवस्थित धुवून घ्या आणि त्यानंतर भिजत टाका.

२. इडल्या व्यवस्थित फुगण्यासाठी डाळ- तांदूळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. खूपच घाई असेल तर कमीतकमी ४ तास तरी भिजू द्या.

 

३. खूप जण डाळ- तांदूळ एकत्र करून मिक्सरमधून फिरवतात. असं एकत्र करू नका. डाळ- तांदूळ मिक्सरमधून वेगवेगळे वाटून घ्या. सगळ्यात आधी डाळ वाटून घ्या, त्यानंतर तांदूळ वाटा. डाळ आणि तांदूळ दोन्ही जाडे- भरडे न वाटता त्याची एकदम पातळ पेस्ट करा.

४. आता एका मोठ्या भांड्यात डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ एकत्र करा. त्यात अर्धा टीस्पून मीठ, २ टीस्पून तिळाचं तेल टाका. तिळाचंच तेल टाकावं असं सक्तीचं नाही. पण तिळाच्या तेलाने इडलीची चव आणखी खुलते.

 

५. हे सगळं टाकल्यानंतर एका चमच्याने इडलीचं पीठ ३ ते ४ मिनिटे गोलाकार दिशेने हलवून घ्या. इडल्या मऊ होण्यासाठी ही स्टेप सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यानंतर हे पीठ ६ ते ८ तास झाकून ठेवा. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात एखादी शाल या भांड्यावर टाकून ठेवावी. जेणेकरून पीठ चांगलं आंबलं जाईल.  


 

Web Title: How to make perfect idli “batter” at home for pillowy soft idli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.