Lokmat Sakhi >Food > कापसाहून हलकी-मऊ इडली करायची तर हे घ्या डाळ-तांदळाचं परफेक्ट प्रमाण, इडलीचा दगड होतो कारण..

कापसाहून हलकी-मऊ इडली करायची तर हे घ्या डाळ-तांदळाचं परफेक्ट प्रमाण, इडलीचा दगड होतो कारण..

how to make perfect idli batter know correct ratio of dal and rice cooking tips : इडली दाटसर आणि कोरडी झाली तर ती घशाखाली उतरत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2024 04:31 PM2024-10-16T16:31:37+5:302024-10-16T17:30:39+5:30

how to make perfect idli batter know correct ratio of dal and rice cooking tips : इडली दाटसर आणि कोरडी झाली तर ती घशाखाली उतरत नाही.

how to make perfect idli batter know correct ratio of dal and rice cooking tips :Idli should not be hard, but look for the perfect ratio of dal-rice | कापसाहून हलकी-मऊ इडली करायची तर हे घ्या डाळ-तांदळाचं परफेक्ट प्रमाण, इडलीचा दगड होतो कारण..

कापसाहून हलकी-मऊ इडली करायची तर हे घ्या डाळ-तांदळाचं परफेक्ट प्रमाण, इडलीचा दगड होतो कारण..

इडली-सांबार किंवा इडली चटणी हा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचाच आवडीचा बेत. झटपट होणारी, हेल्दी आणि गरमागरम इडली सगळ्यांनाच आवडते. घाईच्या वेळी पटकन इडलीचा कुकर लावला की नाश्ता असो वा जेवण मस्त होते. बरेचदा मुलांच्या डब्याला, गावाला जाताना सोबत नेण्यासाठीही हा सोपा पर्याय असतो. नेहमीचीच डाळ-तांदळाची इडली पण ती कधी दाटसर होते तर कधी एकदम कोरडी. इडली अशी झाली की ती घशाखाली उतरत नाही (how to make perfect idli batter know correct ratio of dal and rice cooking tips).

पण मऊ-लुसलुशीत इडली झाली तर मात्र ती खायलाही छान वाटते. ही इडली छान व्हावी यासाठी इडलीसाठी डाळ-तांदूळ घेण्यापासून ते भिजवणे, वाटणे, आंबवणे आणि इडल्या लावणे अशी सगळी प्रक्रिया असते. या प्रत्येक टप्प्यावर योग्य ती काळजी घेतली तर इडल्या छान लुसलुशीत होतात. आता यासाठी डाळ आणि तांदळाचे प्रमाण नेमके किती घ्यायचे पाहूया ...

१. इडली हा पौष्टीक पदार्थ मानला जातो, पण हे पीठ आपण घरी केले असेल तर ते अधिक पोष्टीक म्हणता येईल. डाळ-तांदूळ भिजवणे आणि आंबवणे या प्रक्रियेत त्यावर बरीच क्रिया होते.  हे आंबलेले पीठ आरोग्यासाठी विविध कारणांनी चांगले असते असे म्हणतात. पण ते किती तास आणि कसे आंबवतो हेही महत्त्वाचे आहे. 

२. तांदूळ हा काही प्रमाणात पौष्टीक असतोच पण इडलीमध्ये असणाऱ्या डाळी आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असतात. डाळींतून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रथिने मिळत असल्याने इडलीच्या पीठात डाळींचे प्रमाण चांगले असायला हवे. तर या मेन्यूचा पोषण मिळण्यास उपयोग होतो. 

३. म्हणूनच घरात इडलीचे पीठ भिजवताना आपण डाळींचे प्रमाण चांगले असेल असे पाहतो. २:१ हे प्रमाण सामान्यपणे आपण वापरतो. म्हणजेच २ वाट्या तांदूळ असेल तर १ वाटी उडीद डाळ घेतो. पण इडली जास्त लुसलुशीत व्हायची असेल तर थोडी मूगाची आणि थोडी हरभरा डाळही घ्यायला हवी. या दोन्ही डाळी मिळून अर्धी वाटी घेतल्या तर अर्धी वाटी तांदूळही वाढवायला हवा.

४. म्हणजेच २.५ वाटी तांदूळ, १ वाटी उडीद डाळ आणि अर्धी वाटी मूग आणि हरभरा डाळ एकत्र असे प्रमाण घेतले तर इडलीचे टेक्स्चर अतिशय छान येते. या प्रमाणामुळे डाळ तांदूळ चांगले भिजते. वाटल्यानंतर याचे पीठही चांगले आंबते. मग साहजिकच इडल्याही छान हलक्या, लुसलुशीत होतात.  

Web Title: how to make perfect idli batter know correct ratio of dal and rice cooking tips :Idli should not be hard, but look for the perfect ratio of dal-rice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.