Join us  

जाळीदार डोसे, लुसलुशीत इडली हवी? पाहा डाळ तांदूळ प्रमाण गणित, करा परफेक्ट साऊथ इंडियन पदार्थ...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2023 9:22 AM

How To Make Perfect Idli Dosa Batter At Home : इडली, डोसा तयार करण्यासाठी पीठ बनवायचे योग्य प्रमाण काय आहे ते समजून घेऊ.

आपल्यापैंकी बऱ्याचजणांच्या घरी सकाळच्या नाश्त्याला इडली, डोसा, मेदू वडा असे दाक्षिणात्य पदार्थ सर्रास बनतात. घरांतील प्रत्येकाला नाश्त्याला हे पदार्थ खाणे खूपच आवडते. गरमागरम मऊ इडली, जाळीदार नरम डोसा यांच्यासोबत सांबर, खोबऱ्याची चटणी खाणे यांसारखे दुसरे सुखच नाही. तांदूळ व उडीद डाळ भिजवून त्यांचे जाड घट्टसर पीठ वाटून आपण इडली, डोसा यांसारखे पदार्थ तयार करतो. परंतु  हे पदार्थ तयार करताना आपण जर पीठ घरीच तयार करत असू तर खूप खबरदारी घ्यावी लागते.

इडली व डोसा यांचे पीठ तयार करताना तांदूळ, उडीद डाळ यांचे प्रमाण चुकले तर इडली, डोसे बनवताना बिघडतात. कित्येकवेळा पीठ फुलून आले नाही म्हणून इडली, डोसे मऊ, लुसलुशीत होत नाहीत. एवढा सगळा घाट घालूंन इडली, डोसे मनासारखे झाले नाही तर हिरमोड होतोच, व ते चवीलाही चांगले लागत नाहीत. मऊ इडली, जाळीदार नरम डोसा होण्यासाठी त्याचे पीठ बनविण्यासाठी तांदूळ व उडीद डाळ यांचे प्रमाण योग्य घेऊन पीठ तयार करावे. इडली, डोसा तयार करण्यासाठी पीठ बनवायचे योग्य प्रमाण काय आहे ते समजून घेऊ(How To Make Perfect Idli Dosa Batter At Home). 

साहित्य :- 

१. तांदूळ - २, १/२ कप२. उडीद डाळ - १ कप३. चणाडाळ - २ ते ३ टेबलस्पून ४. मेथी - १ टेबलस्पून ५. पोहे - १/२ कप ६. मीठ - चवीनुसार ७. पाणी - गरजेनुसार ८. शिजवून घेतलेले भात - १ कप (पर्यायी) 

इडली - डोसा - आप्पे, पदार्थ ३ - पीठ १! असे मल्टिपर्पज परफेक्ट पीठ कसे बनवायचे, पाहा कृती...

कृती :- 

१. एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तांदूळ किमान ७ ते ८ तासांसाठी भिजत ठेवावेत. २. आता उडीद डाळ, चणाडाळ, मेथी हे सर्व जिन्नस एकत्रित करुन एका वेगळ्या भांड्यात किमान ७ ते ८ तासांसाठी भिजत ठेवावे.   ३. ७ ते ८ तासांनंतर तांदूळ व्यवस्थित भिजल्यानंतर त्यांतील पाणी काढून टाकावे व ते मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यावे. ४. त्यानंतर उडीद डाळ, चणाडाळ, मेथी हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये एकत्रित वाटून घ्यावे. ५. त्यानंतर सुके पोहे देखील मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. (वाटताना त्यामध्ये १/२ कप सुके पोहे किंवा शिजवून घेतलेला भात घालावा.)६. आता एका हवाबंद डब्यांत सर्वप्रथम तांदुळाचे वाटून घेतलेले पीठ ओतावे त्यानंतर उडीद डाळ, चणाडाळ, मेथी यांचे मिश्रण त्या डब्यांत ओतावे. 

७. सर्वात शेवटी सुके पोहे वाटून घेऊन ते डब्यात ओतावे. आता चमच्याच्या मदतीने हे पीठ नीट ढवळून घ्यावे.   ८. वाटलेले पीठ नेहमी हवाबंद डब्यात भरुन गरम ठिकाणी ठेवा किंवा डब्यावर कापड ठेवा यामुळे पीठ फुलून येण्यास मदत होते. ९. हे पीठ व्यवस्थित फुगायला कमीतकमी ८ ते १० तास लागतात. 

डोसा तव्याला चिकटू नये म्हणून ७ सोप्या टीप्स, डोसा तव्याला न चिकटता होईल हॉटेलसारखा कुरकुरीत...

हे पीठ वापरुन आपण मऊ इडली किंवा नरम, जाळीदार डोसे बनवू शकतां.

टॅग्स :अन्नपाककृती