Lokmat Sakhi >Food > हॉटेलस्टाइल परफेक्ट मोकळा जीरा राईस करण्याची ही घ्या रेसिपी, घरीच करा १५ मिनिटांत

हॉटेलस्टाइल परफेक्ट मोकळा जीरा राईस करण्याची ही घ्या रेसिपी, घरीच करा १५ मिनिटांत

How To Make Perfect Jeera Rice - Flavoured Cumin Rice | Easy Restaurant Style Jeera Rice Recipe : सगळ्यांच्या आवडीचा हॉटेलस्टाईल जीरा राईस करण्याची सोपी कृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2024 02:13 PM2024-03-21T14:13:46+5:302024-03-21T14:22:39+5:30

How To Make Perfect Jeera Rice - Flavoured Cumin Rice | Easy Restaurant Style Jeera Rice Recipe : सगळ्यांच्या आवडीचा हॉटेलस्टाईल जीरा राईस करण्याची सोपी कृती

How To Make Perfect Jeera Rice - Flavoured Cumin Rice | Easy Restaurant Style Jeera Rice Recipe | हॉटेलस्टाइल परफेक्ट मोकळा जीरा राईस करण्याची ही घ्या रेसिपी, घरीच करा १५ मिनिटांत

हॉटेलस्टाइल परफेक्ट मोकळा जीरा राईस करण्याची ही घ्या रेसिपी, घरीच करा १५ मिनिटांत

पार्टी, लग्न किंवा घरातील छोटेखानी समारंभ. प्रत्येक सणावाराला आपण जीरा राईस (Jeera Rice) हमखास करतो. जिरा राईस आपण दाल फ्राय, दाल तडका, सांबर सोबत खाल्ला तर अधिकच चविष्ट लागतो. हॉटेलमधील जीरा राईस खाल्ल्यानंतर, त्याच प्रकारचा जिरा राईस आपण घरी बनवण्याचा प्रयत्न करतो. पण आपला प्रयत्न बऱ्याचदा फसतो. जीरा राईस मोकळा तयार होत नाही. किंवा भाताचा गचका (Cooking Tips) होतो.

जर आपल्याला घरात हॉटेल स्टाईल मोकळा जीरा राईस करायचा असेल तर, एकदा या रेसिपीला फॉलो करून पाहा (Kitchen Tips and Tricks). रेसिपितील काही टिप्समुळे जीरा राईस मोकळा तयार होईल. शिवाय गरमागरम राईस खाल्ल्याने मन देखील तृप्त होईल(How To Make Perfect Jeera Rice - Flavoured Cumin Rice | Easy Restaurant Style Jeera Rice Recipe).

मोकळा जीरा राईस करण्यासाठी लागणारं साहित्य

बासमती तांदूळ

पाणी

तूप

जिरे

दालचिनी

नारळातून खोबरं काढणं होईल सोपं, २ भन्नाट ट्रिक्स! कष्ट विसरा- खोबरं मिळेल झटपट

लवंग

काळी मिरी

वेलची

कृती

सर्वप्रथम, एका बाऊलमध्ये एक कप बासमती तांदूळ घ्या. त्यात २ ते ३ वेळा पाणी घालून तांदूळ स्वच्छ धुवून घ्या. नंतर त्यात पुन्हा २ कप पाणी घाला. ३० मिनिटासाठी तांदूळ पाण्यात भिजत ठेवा.

आता एका भांड्यात ४ कप पाणी घाला. नंतर त्यात एक तमालपत्र, दालचिनीचा तुकडा, ४ ते ५ काळी मिरी, वेलची लवंग आणि एक टेबलस्पून तूप घालून मिक्स करा. नंतर त्यात ३० मिनिटांसाठी भिजत ठेवलेले बासमती तांदूळ घालून मिक्स करा. मध्यम आचेवर तांदूळ शिजवून घ्या.

चवळी भिजत न घालता, झणझणीत हॉटेलस्टाईल उसळ करण्याची सोपी कृती; १० मिनिटात उसळ तयार

काही वेळानंतर भात शिजला आहे की नाही चेक करा. भात शिजला असेल तर, चाळणीवर भात ओतून त्यातून पाणी निथळून काढा. एका पॅनमध्ये ३ टेबलस्पून तूप घाला. तूप विरघळल्यानंतर त्यात दोन टेबलस्पून जिरे घाला. जिरे तडतडल्यानंतर त्यात शिजलेला भात घालून चमच्याने अलगदपणे मिक्स करा. शेवटी चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर भुरभुरून डिश सर्व्ह करा. आपण हा हॉटेल स्टाईल जीरा राईस डाळ तडका किंवा इतर भाज्यांसोबत खाऊ शकता. 

Web Title: How To Make Perfect Jeera Rice - Flavoured Cumin Rice | Easy Restaurant Style Jeera Rice Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.