Join us  

परफेक्ट उडपीस्टाइल गोलगरगरगरीत खमंग हलका मेदू वडा घरी कसा बनवायचा? ही घ्या रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2023 1:07 PM

How to make perfect medu vada at home : आपण घरी मेदू वडा करतो पण तो गोल होत नाही, कधी आतून हलका होत नाही, असं का? त्यांचंच हे उत्तर....

आपण नाश्त्याला बऱ्याचवेळा साऊथ इंडियन पदार्थ बनवून ते आवडीने खातो. या साऊथ इंडियन पदार्थांमध्ये आपल्याला इडली, आप्पे, डोसा, उपमा, मेदू वडा खायला प्रचंड आवडते. मेदू वडा हा उडीद डाळीपासून बनवलेला दक्षिण भारतीय पदार्थ आहे. हे बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊ असतात आणि अगदी डोनटसारखे दिसतात. दक्षिण भारतीय समाजाखेरीज भारताच्या विविध प्रांतात हा पदार्थ नाश्त्यामध्ये समाविष्ट केला जातो. जेव्हा आपण कुटुंबासोबत कधी बाहेर उडप्याकडे दक्षिण भारतीय पदार्थ खायला जातो तेव्हा मेदू वडा नक्कीच ऑर्डर करतो. परंतु हा पदार्थ आपण घरी करून पाहायचा झाला तर आपल्याला बाहेरच्यासारखा घरी बनवायला जमत नाही. किंबहुना या पदार्थाला दिलेला डोनटसारखा आकार आपण घरी कितीही प्रयत्न करून आपल्याला देता येत नाही. उडप्यासारखा मेदू वडा घरी बनवता यावा आणि त्या वड्याला असणारा परफेक्ट गोल आकार देण्यासाठी काही टीप्स समजून घेऊयात(How to make perfect medu vada at home).

साहित्य:

१. उडीद डाळ - २ कप (रात्रभर भिजत ठेवलेली)

२. हिरव्या मिरच्या - २ ते ४ (बारीक चिरून घेतलेल्या)

३. चमचे कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

४. आल -  १ टेबलस्पून  (बारीक चिरून घेतलेले)

५. कढीपत्ता - ६ ते ८ पान (बारीक चिरून घेतलेला)

६. ताजे नारळाचे तुकडे - १/४ कप

७. काळी मिरी - ५ ते १०  (ठेचून बारीक पूड करून घ्या)

८. मीठ - चवीनुसार

९. तेल - तळण्यासाठी

१०. गरजेनुसार पाणी - (पिठाला पातळ करण्यासाठी आवश्यक थोडेसे पाणी)

kabitaskitchen या इंस्टाग्राम पेजवरून परफेक्ट उडपी स्टाईल मेदू वडा घरी कसा बनवायचा याचे साहित्य आणि कृती समजून घेऊयात.  

 कृती : - 

१. मेंदू वडा बनवण्यासाठी प्रथम २ कप उडीद डाळ रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. दुस-या दिवशी डाळ चांगली फुगली की, मग पाणी काढून मिक्सरमध्ये जाडसर पीठ बनवा.२. मिक्सरमध्ये डाळ टाकताना पाण्याच्या प्रमाणाची विशेष काळजी घ्या, जर पाणी जास्त असेल तर वडा बनवताना अडचण येऊ शकते. म्हणूनच डाळीत फक्त २-३ चमचे पाणी घाला.३. एका बाऊलमध्ये हे मिक्सर केलेले पीठ काढून घ्या आणि चांगल ढवळत राहा जेणेकरून त्यात हवा भरेल.४. हे पीठ फेटताना मधे - मधे १ चमचा पाणी घालत रहा. जेव्हा तुम्हाला वाटेल की डाळीचे पीठ पांढरे झाले आहे आणि पिठाचे प्रमाण देखील वाढले आहे, तेव्हा थांबा.५. फेटल्यानंतर, एक चमचा पिठ पाण्यात टाका आणि ते पाण्याच्या वर तरंगते का ते पहा, जर ते पाण्याच्या वर व्यवस्थित तरंगत असेल तर तुमचे पिठ पूर्णपणे तयार आहे.६. आता त्यात बारीक चिरलेल्या नारळाचे तुकडे, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, ५-१० ठेचलेली काळी मिरी पूड आणि चवीनुसार मीठ घालून हाताने चांगले मिसळा.७. आता एका कढईत तेल गरम करून हातावर चमचाभर पिठ घेऊन त्याचा जाड गोळा बनवा, बोटाच्या साहाय्याने मधोमध छिद्र करा आणि वडा तेलात सोडा. थोड्याच वेळात वाड्याला सोनेरी रंग येऊ लागेल.८. हा मेदूवडा कुरकुरीत होई पर्यंत तळा.

तुमचा परफेक्ट उडपी स्टाईल मेदूवडा चटणी आणि सांबारसोबत खाण्यासाठी तयार आहे. 

yumyum_cookiing या पेजवरून मेदू वड्याला परफेक्ट डोनटसारखा आकार कसा द्यायचा याच्या टीप्स आणि ट्रिक्स समजून घेऊयात.

टॅग्स :अन्नपाककृती