नाश्त्याला (Breakfast Recipe) काहीतरी गरमागरम, खमंग पदार्थ खावासा वाटला तर तुम्ही गरमागरम मेदूवडे बनवू शकता. (How to make meduvada crispy and soft) सकाळच्या नाश्त्याला किंवा मधल्यावेळेत भूक लागल्यानंतर खाण्यासाठी हा पदार्थ उत्तम पर्याय आहे. मेदूवडे जास्त तेल पितात, कुरकुरीत होत नाहीत अशी अनेकींची तक्रार असते. मार्केटसारखे परफेक्ट चवीचे कुरकुरीत मेदूवडे बनवणं एकदम सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला काही टिप्स फॉलो कराव्या लागतील.(How to make perfect meduvada)
मेदूवडे करण्यासाठी सगळ्यात आधी १ कप उडीदाची डाळ रात्रभर भिजवत ठेवा. भिजवलेली डाळ सकाळी पाण्यातून काढून मिक्सरच्या भांड्यात घाला आणि त्यात बर्फाचे तुकडे घालून बारीक दळून घ्या. त्यात २ चमचे जीरं, १ चमचा तांदळाचं पीठ, काळी मिरी, कसुरी मेथी, बारीक चिरलेला कांदा, हिंग घाला. हे मिश्रण एकजीव केल्यानंतर एका ग्लासाच्या वरच्या भागाला पातळ कापड आणि प्लास्टीक लावून घ्या आणि बारीक रबरानं ग्लासचं तोंड लॉक करा. वरच्या भागाला पाणी लावून त्यावर वड्याचं पीठ घालून मध्यभागी गोल करा आणि गरमागरम वडे तळून घ्या.
जर तुम्ही पहिल्यांदाच वडा बनवत असाल तर गरम कढईत वडा घालण्यासाठी प्लास्टिकचे ग्लोव्हज घाला. वड्याला तेल लावून हलक्या हाताने कढईत टाकून तुम्ही सहज आकार देऊ शकता. वडे मोठ्या आचेवर तळून घ्या आणि नंतर गॅस कमी करून तळून घ्या. वडे जरा जास्त आचेवर तळले तर वडे वरून शिजतात पण आतून व्यवस्थित शिजत नाही. वडा हलका तपकिरी रंगाचा होऊ लागला की, तव्यातून काढून टिश्यू पेपरमध्ये ठेवा. गरमागरम मेदूवडे तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा सांबारसह खाऊ शकता.