Lokmat Sakhi >Food > वाटी-चमच्याने द्या मोदकाला परफेक्ट आकार! नाजूक-सुबक होतील मोदक-पाहा भन्नाट आयडिया...

वाटी-चमच्याने द्या मोदकाला परफेक्ट आकार! नाजूक-सुबक होतील मोदक-पाहा भन्नाट आयडिया...

Modak Without Mould : How to Make perfect Shape Modak At Home : Perfect Modak Shape : आता मोदकाला आकार देण्याचे किचकट काम वाटी - चमच्याच्या मदतीने होईल सोपे, वापरा एक सोपी ट्रिक...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2024 01:09 PM2024-09-06T13:09:12+5:302024-09-06T13:36:16+5:30

Modak Without Mould : How to Make perfect Shape Modak At Home : Perfect Modak Shape : आता मोदकाला आकार देण्याचे किचकट काम वाटी - चमच्याच्या मदतीने होईल सोपे, वापरा एक सोपी ट्रिक...

how to make Perfect Modak Shape How to Make perfect Shape Modak At Home Modak Easy Folding Modak Without Mould | वाटी-चमच्याने द्या मोदकाला परफेक्ट आकार! नाजूक-सुबक होतील मोदक-पाहा भन्नाट आयडिया...

वाटी-चमच्याने द्या मोदकाला परफेक्ट आकार! नाजूक-सुबक होतील मोदक-पाहा भन्नाट आयडिया...

गणेश चतुर्थीला घराघरांमध्ये गणपती बाप्पांचे आगमन होणार आहे. बाप्पाच्या आगमनासाठी आपण सगळेच त्याच्या येण्याआधी सगळी जय्यत तयारी करुन ठेवतो. घरोघरी साफ-सफाई आणि सजावटीपासून ते बाप्पाच्या नैवेद्यापर्यंतची सगळी तयारी आत्तापर्यंत झाली असेलच. गणेश चतुर्थीला गणपती बाप्पाचे आगमन  झाल्यानंतर मऊसूत आणि चविष्ट उकडीच्या मोदकांचा नवैद्य दिला जातो. गणपती बाप्पाच्या नैवेद्याची थाळी मोदकांशिवाय पूर्ण होऊच शकत नाही. बाप्पासाठी हे उकडीचे मोदक (How to make perfect ukadiche modak recipe with rice flour) बनवण्याचा घाट घातला जातो. घरातल्या प्रत्येकाला मोदक खायला जितके आवडतात तितकेच ते बनवताना गृहिणींची दमछाक होते. मोदक बनवणे हे सोपे काम नाही. प्रत्येकाला उकडीचे मोदक बनवायला जमतातच असे नाही(Perfect Modak Shape).

उकडीचे मोदक दिसायला आकर्षक दिसतात ते त्यांच्या बारीक कळ्यांमुळेच. जितक्या या कळ्या बारीक, नाजूक व सुबक असतात तितकी ती गृहिणी स्वयंपाक करण्यात उत्तम आहे असे मानले जाते. अनेकजण साच्याने किंवा हाताने कळ्या (Modak Without Mould) पाडून मोदक तयार करतात. असे असले तरीही कळ्या पाडून तयार केलेले मोदक दिसायलाही खूप सुरेख दिसतात. पण सर्वांनाच मोदकाचा परफेक्ट आकार आणि मोदकाच्या कळ्या करणं जमतच असे नाही, अनेकदा कळ्या करताना मोदकाची पारी फाटके (modak easy folding) किंवा त्यांचा आकार नीट येत नाही. अशावेळी कळ्या चांगल्या बनवण्यासाठी (How to Make perfect Shape Modak At Home) तसेच मोदकाला परफेक्ट आकार येण्यासाठी एक झटपट ट्रिक पाहूयात. ही ट्रिक फॉलो करुन आपण कळ्या (Modak Easy Folding) असलेले सुंदर उकडीचे मोदक तयार  करु शकता(how to make perfect ukadiche modak).

१. वाटीच्या मदतीने मोदकाला आकार कसा द्यावा ? 

मोदकाच्या पारीचे पीठ मळून घेतल्यानंतर त्याचे लहान लहान आकाराचे गोळे तयार करून घ्यावेत. आता आपल्या दोन्ही हातांना तेल लावून एक गोळा हातात घ्यावा. या गोळ्याला बरोबर मध्यभागी थोडा बोटांनी दाब देत त्याला खोलगट वाटी सारखा आकार द्यावा. त्यानंतर एक वाटी घेऊन त्या वाटीच्या तळाशी थोडेसे पाणी लावून घ्यावे. पाणी लावल्यानंतर मोदकाच्या पारीला खोलगट आकार दिलेला होता ती पारी वाटीच्या तळाशी ठेवून द्यावी. त्यानंतर हळुहळु हातांनी दाब देत खोलगट पारी तयार करून घ्यावी. त्यानंतर सुरी वाटीच्या कोपऱ्यातून हळुहळु आत घालूंन पारी मोकळी करुन घ्यावी. आता ही पारी काढून घेऊन हाताचा अंगठा आणि पहिली दोन बोटं यांच्या मदतीने मोदकाला कळ्या पाडून घ्याव्यात. कळ्या पाडून झाल्यावर त्यात बरोबर मध्ये सारण भरुन घ्यावे. सारण भरुन झाल्यानंतर या सगळ्या कळ्या एकत्रित करुन मोदकाचे वरचे तोंड बंद करुन घ्यावे. 

गणेशोत्सव स्पेशल : घरीच झटपट करा रसमलाई मोदक, कपभर पनीर आणि फक्त १० मिनिटांत मोदक तयार...

२. चमच्याच्या वापर करून मोदकाला सुबक कळ्या कशा पाडाव्यात ?

मोदकाची पारी तयार करण्यासाठी उकड काढली की त्या उकडीचा चांगला गोळा मळून घ्यावा. त्यानंतर या उकडीचे लहान गोलाकार छोटे गोळे तयार करुन घ्यावेत. यानंतर हाताला थोडे पीठ किंवा तेल लावून त्याला हाताने पुरीसारखा पण थोडा खोलगट आकार द्यावा. आता या खोलगट पुरीमध्ये मोदकासाठी बनवलेले गूळ, खोबऱ्याचे सारण चमच्याने व्यवस्थित भरुन घ्यावे. यानंतर ही पारी सर्व बाजूने पूर्ण बंद करुन घ्यावी आणि त्याला मोदकाचा आकार द्यावा. आता चमच्याच्या मदतीने मोदकावर ठराविक अंतरावर खाचा करुन कळ्या पाडून घ्याव्यात. यानंतर चाळणीवर किंवा मोदक पात्रात हे मोदक ठेवून १५ मिनिटे वाफवून घ्यावे. तयार मोदकांवर साजूक तूप घालून बाप्पाला नैवेद्य दाखवा.

तब्बल महिनाभर टिकतील असे गव्हाच्या पिठाचे मोदक, पौष्टिकही आणि प्रसादासाठीही उत्तम-सोपी रेसिपी...

अशाप्रकारे आपण वाटी, चमच्याच्या मदतीने अगदी सोप्या पद्धतीने मोदकाचा आकार आणि कळ्या तयार करु शकता. यामुळे मोदक दिसायलाही सुंदर, सुबक आणि नाजूक दिसतील.

Web Title: how to make Perfect Modak Shape How to Make perfect Shape Modak At Home Modak Easy Folding Modak Without Mould

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.