फक्त श्रावणातच (Shrawan Mass 2023) नाही संपूर्ण वर्षभर उपवासाच्या दिवशी लोक साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्याचे इतर पदार्थ खातात. श्रावण (Sawan 2023) महिन्यात बरेच उपवास येतात. (Tips to make non sticky sabudana khichdi) नेहमीप्रमाणे साबुदाण्याच्या खिचडीला पहिली पसंती असते चटपटीत चवीमुळे आणि मऊ टेक्स्चरमुळे उपवास नसलेल्यांनाही साबुदाणा खायचा मोह आवरला जात नाही. (How to make perfect non-sticky Sabudana Khichdi) पण घाईघाईत कधी साबुदाणा भिजवायचा राहून जातो. आयत्यावेळी साबुदाणा भिजवून खिचडी केली तर ते व्यवस्थित भिजत नाहीत. परिणामी खिचडी कडक होते किंवा चिकट गोळा होतो अशी अनेकांची तक्रार असते. साबुदाण्यांची खिचडी चिकट होऊ नये यासाठी काही सोप्या ट्रिक्स पाहूया. (Non Sticky Sabudana Khichdi)
साबुदाणा भिजवताना या गोष्टींची काळजी घ्या (Perfect non-sticky Sabudana Khichdi Recipe)
साबुदाणा जर व्यवस्थित फुललेला नसेल तर कढईत टाकताच दाणे एकमेकांना चिकटू लागतील. अशात साबुदाणे पूर्णपणे फुलण्यासााठी पुरेसा वेळ द्या. यासाठी रेसिपी बनवण्याच्या कमीत कमी ४ ते ५ तास आधी साबुदाणा भिजवून ठेवा. पदार्थ करण्याच्या अर्धा तास आधी त्यातलं पाणी काढून गाळणीत ठेवा.
तेल वापरता की तूप?
साबुदाण्याची खिचडी जास्त चिकट होऊ नये यासाठी तुम्ही कोणतं तेल किंवा तूप वापरता हे महत्वाचं असतं. तेलाऐवजी तुपाचा वापर केला तर चव अधिक वाढते आणि खिचडी मऊ-मोकळी होते. याशिवाय त्यात बटाटे घातल्यानं खिचडीचा चिकटपणा कमी होतो.
साबुदाण्याची खिचडी जास्तवेळ शिजवल्यामुळेही चिकट होते त्यामुळे एक ते दोनवेळा वाफ काढल्यानंतर गॅस बंद करा. जर तुम्हाला साबुदाणा खिचडी शिजल्याचा अंदाज येत नसेल तर मध्ये मध्ये हातानं दाणे शिजले आहेत की नाही ते चेक करत राहा. साबुदाणा व्यवस्थित फुलला नसेल तर पॅनला चिकटणं कॉमन आहे. थोडं तेल घातल्यानंतर दाणे एकमेकांना चिकटणार नाहीत.
साबुदाणे वडे बनवत असाल तर साबुदाणे भिजवण्याची सेम प्रक्रिया करा. फक्त बटाटे उकडल्यानंतर काहीवेळ सुकण्यासाठी सालं काढून बाजूला ठेवा. जर नुकताच शिजवलेला बटाटा साबुदाणा वड्यांसाठी वापरला तर वडे चिकट होऊ शकतात ते तेलात फुटण्याची भिती असते.