Lokmat Sakhi >Food > Navratri 2024 : साबुदाणा खिचडीचा गोळा होतो-चिकट होते? १ ट्रिक -खिचडी होईल मऊ मोकळी

Navratri 2024 : साबुदाणा खिचडीचा गोळा होतो-चिकट होते? १ ट्रिक -खिचडी होईल मऊ मोकळी

Navratri Special How To Make Perfect Non Sticky Sabudana Khichdi : साबुदाणा खिचडी परफेक्ट जमणं हे काही सोपं काम नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 05:09 PM2024-10-02T17:09:34+5:302024-10-02T18:44:18+5:30

Navratri Special How To Make Perfect Non Sticky Sabudana Khichdi : साबुदाणा खिचडी परफेक्ट जमणं हे काही सोपं काम नाही.

How To Make Perfect Non Sticky Sabudana Khichdi : Sabudana Khichdi Making Tips How to Make Sabudana Khichdi | Navratri 2024 : साबुदाणा खिचडीचा गोळा होतो-चिकट होते? १ ट्रिक -खिचडी होईल मऊ मोकळी

Navratri 2024 : साबुदाणा खिचडीचा गोळा होतो-चिकट होते? १ ट्रिक -खिचडी होईल मऊ मोकळी

नवरात्रीच्या (Navratri 2024) दिवसांत उपवासाला साबुदाणे मोठ्या प्रमाणात  खाल्ले जातात. काही  लोक फक्त फळं खातात  तर काहीलोक उपवासाचे पदार्थ खातात काहीजणांना  खिचडी खायला खूप आवडते. पण सोपी वाटणारी साबुदाणा खिचडी अनेकदा बिघडते. शेफ पंकज भदौरीया यांनी  याबाबत माहिती दिली आहे. (How To Make Perfect Non Sticky Sabudana Khichdi)

पंकज यांनी इंस्टाग्रामवर जो व्हिडिओ शेअर केला आहे त्यात त्यांनी नॉन स्टिकी साबुदाणा खिचडी बनवण्यासाठी सगळ्यात आधी  योग्य साबुदाणे निवडण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी सांगितले की  ३ प्रकारचे साबुदाणे असतात ज्यात एक मोठा साबुदाणा असतो जो तळण्यासाठी वापरला जातो. छोटा साबुदाणा खिचडीसाठी वापरला जातो पण लोक मिडीयम आकाराचा साबुदाणा खिचडी करण्यासाठी वापरतात. हा साबुदाणा खिचडीसाठी बेस्ट असतात.

साबुदाणा नॉन स्टिकी आणि चांगला बनण्यासाठी साबुदाणा वेळीच भिजवणं गरजेचं आहे. साबुदाण्याची खिचडी चविष्ट आणि नॉनस्टीकी होण्यासाठी साबुदाणा  रगडून धुवा जेणेकरून त्यातलं स्टार्च निघून जाईल. 
साबुदाणा भिजवताना साबुदाणा आणि पाण्याचा रेश्यो खूप महत्त्वाचा असतो. पंकज भदौरीया सांगतात की १ कप साबुदाण्यांमध्ये ३ कप पाणी घालून भिजवायला हवं. याव्यतिरिक्त कमीत कमी ६ तास साबुदाणे भिजवून ठेवा. ज्यामुळे साबुदाण्यांची खिचडी मऊ होईल.


या पद्धतीने करा साबुदाण्याची खिचडी

व्हिडीओमध्ये पंकज भदौरीया दाखवतात की अर्धा कप शेंगदाणे ड्राय रोस्ट करा. जेव्हा शेंगदाण्यांचे साल निघेल आणि दाणे भाजून होतील तेव्हा गॅस बंद करा. याची सालं काढून घ्या.  नंतर शेंगदाणे मिक्सरमध्ये घालून वाटून घ्या. नंतर भिजवलेले शेंगदाणे त्यात घाला तसंच सैंधव मीठ घालून व्यवस्थित मिक्स करा.

रोजच्या वापरासाठी चांदीच्या पैंजणांच्या नाजूक डिजाईन्स; आकर्षक-सुंदर पैंजणांनी पाय उठून दिसतील

नंतर पॅनमध्ये तूप घालून जीऱ्यांची फोडणी द्या. काहीवेळ वाफेवर शिजू द्या. चार ते पाच मिनिटं शिजल्यानंतर मंद आचेवर शिजवा नंतर गॅस बंद करा त्यात थोडे धणे, थोडी हिरवी मिरची आणि लिंबू घाला. तयार आहे साबुदाण्याची खिचडी

Web Title: How To Make Perfect Non Sticky Sabudana Khichdi : Sabudana Khichdi Making Tips How to Make Sabudana Khichdi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.