Join us

कांदापोहे कधी कडक तर कधी लगदा होतो? १ सोपी पद्धत, करा मऊ-मोकळे पोहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2023 13:51 IST

How to make perfect poha : हॉटेलमध्ये पोहे खायला अनेकांना आवडत नाही. कारण घरची चव अफलातून असते. पण काहीवेळा घरी बनवताना पोहे भिजवताना जास्त भिजवले जातात तर कधी त्याचा लगदा होतो.

नाश्त्याला पोहे खायला सर्वांनाच आवडतं. पोहे हा सर्वांच्याच आवडीचा नाश्ता आहे. पोहे खायला जितके चवदार, चविष्ट लागतात तितकेच बनवायलाही सोपे आणि झटपट असतात. (Easy tips to keep in mind while making Poha) जर तुम्ही हलकं-फुलकं काहीतरी खायचं मन करत असेल तर तुम्ही नाश्त्याला उत्तम चवीचे पोहे खाऊ शकतं. अनेकांची तक्रार असते की पोहे व्यवस्थित दाणेदार, मऊ होत नाही किंवा जास्त गचके होतात. (How to make perfect poha)

काही लोकांना टेक्चर बिघडल्यामुळे  पोहे खायला अजिबात आवडत नाही. कारण पोह्यांची चवही व्यवस्थित लागत नाही. हॉटेलमध्ये पोहे खायला अनेकांना आवडत नाही. कारण घरची चव अफलातून असते. पण काहीवेळा घरी बनवताना पोहे भिजवताना जास्त भिजवले जातात तर कधी त्याचा लगदा होतो. पोहे बनवण्याच्या सोप्या स्टेप्स पाहूया.

पोहे बिघडू नये यासाठी टिप्स

१) पोहे जास्तवेळ भिजवून नका. फक्त १ ते २ वेळा धुवून त्यातलं पूर्ण पाणी काढून भिजू द्या.  जर पोहे तुम्ही तांदळाप्रमाणे जास्तवेळ पाण्यात भिजत ठेवले तर ते मोकळे शिजणार नाहीत. 

२) पोहे नेहमी  मंच आचेवर शिजवा. उच्च आचेवर शिजवल्याने पोह्याची चव बिघडू शकते. यामुळे फक्त पोह्याची चव बिघडत नाही तर ते दातांना चिकटतात.

३) लिंबाच्या वापराने पोहे स्वादीष्ट बनतात. पण अनेक महिला लिंबाचा रस घालून पोहे शिजवतात असं न करता पोहे पूर्ण बनल्यानंतर लिंबू घाला.

४) जर तुम्ही पोह्यांमध्ये टोमॅटो घालत असाल तर व्यवस्थित शिजेल याची काळजी घ्या.  अन्यथा कच्चे टोमॅटो पोह्यांमध्ये अजिबात चांगले लागणार नाहीत.

पोहे बनण्याची योग्य पद्धत

१) पोहे बनवण्यासाठी सगळ्यात आधी एका स्टिलच्या मोठ्या गाळणीत पोहे घालून नळाच्या खाली व्यवस्थित धुवून घ्या. त्यानंतर गाळणी वेगळी ठेवा. जेणेकरून त्यातलं एक्स्ट्रा पाणी निघून जायला हवं.  आता कढईमध्ये तेल घालून गॅसवर ठेवा. 

२) तेल गरम झाल्यानंतर त्यात शेंगदाणे फ्राय करून घ्या. आता याच तेलात मोहोरी घाला. त्यानंतर कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, बारीक चिरलेला आणि बारीक चिरलेला बटाटा घाला. बटाटे व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात मीठ, हळद घाला. त्यानंतर त्यात कापलेला टोमॅटो घालून भाजून घ्या. 

३) त्यानंतर पोह्यांना तिखटपणा यावा यासाठी तुम्ही मिरचीसुद्धा घालू शकता. आता एका  गाळणीत ठेवलेले पोहे हाताने वेगळे करून कढईत घालून व्यवस्थित मिक्स करा. हवंतर तुम्ही पोह्यांवर थोडं पाणी शिंपडू शकता. नंतर झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या. त्यानंतर पोहे हलक्या चमच्याच्या साहाय्याने मोकळे करा. नंतर लिंबू, आणि शेव घालून पोहे सर्व्ह करा.

टॅग्स :कुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्सअन्न