खास प्रसंगी, सत्यनारायणाची पूजा किंवा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी बनवला जाणारा गोडाचा पदार्थ अर्थात शिरा. (Prasadacha Sheera recipe)साजूक तुपातला आणि इतर वेळी बनवला जाणाऱ्या शिऱ्यामध्ये बराच फरक असतो. प्रसादाचा शिरा बनवताना त्याचा येणारा खमंग सुवास दरवळू लागला की, कधी एकदा तो खातोय असे आपल्याला होते. (How to make perfect Sheera at home)पदार्थांचे अचूक प्रमाण आणि त्यात घातले जाणारे डायफ्रटूसची चवच वेगळी. इतर दिवशी कितीही प्रयत्न केले तरी प्रसादाच्या शिऱ्याची चव काही येत नाही. (Non-sticky Sooji Sheera tips)घरी पुजेला कुणी येवो ना येवो पण प्रसादाचा शिरा हा हमखास खाल्ला जातो. प्रत्येकाची शिरा बनवण्याची पद्धत देखील वेगळी असते. (Delicious Indian prasad recipe)पण अनेकदा शिरा बनवताना तो परफेक्ट बनत नाही. कधी रवा व्यवस्थित भाजला जात नाही तर कधी तूप-दूधाचे प्रमाण कमी होते. कधी रवाच कच्चा लागतो तर कधी रवा चिकट होतो. (Sheera recipe for Satyanarayan puja)कधी साखरेचे प्रमाण कमी होते तर कधी पाण्याचे प्रमाण जास्त होते. या अशा अनेक चुकांमुळे प्रसादाचा शिरा चविष्ट आणि हवा तसा बनत नाही. कधी कधी रव्याचे गोळे देखील जमतात. त्यामुळे प्रसादाचा शिरा बनवताना आपल्याला जास्त टेन्शन येते परंतु, आम्ही काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. ज्यामुळे प्रसादाचा शिरा परफेक्ट तर बनेलच पण चवही उत्तम लागेल. अगदी आपण १० ते २५० लोकांचा प्रसादाचा शिरा सोप्या पद्धतीने बनवू शकतो पाहूया काही खास टिप्स (Tasty Sheera with ghee and dry fruits)
न थापता करा गरमागरम कोबीच्या कुरकुरीत वड्या, कोबीची भाजी आवडत नाही म्हणणारेही खातील आवडीने
साहित्य
सव्वा वाटीच्या प्रमाणात केळी - सव्वा केळ रवा - सव्वा वाटी तूप - सव्वा वाटी साखर - सव्वा वाटी दूध - सव्वा वाटी पाणी - सव्वा वाटी काजू - ५ ते ७ बदाम - ५ ते ७ तुळस - ५ ते ७ वेलची पूड - छोटा चमचा
कृती
1. एका भांड्यात सव्वा वाटी पाणी आणि सव्वा वाटी दूध घ्या. दूध शक्य असल्यास गाईचे वापरा ज्यामुळे चव आणखी चांगली होईल.
2. आता भांड्यात घेतलेले पाणी आणि दूधाचे मिश्रण उकळवायला ठेवा. काजू, बदाम आणि केळ्याचे बारीक तुकडे करुन घ्या.
3. शिरा बनवण्यासाठी कढई गरम करुन त्यात पाव वाटी तूप घालून काजू-बदाम तळून घ्या. मंद आचेवर तळल्यानंतर कढईतून काढून घ्या.
4. पुन्हा कढईमध्ये १ वाटी तूप घालून रवा चांगल्याप्रकारे मंद आचेवर भाजून घ्या. रवा तुपात फुलल्यानंतर तो चिकट होणार नाही. त्यात केळाचे काप घाला.
5. तुपात आणि रव्यामध्ये केळी तळल्यानंतर ते चांगले भाजले जातात. ज्यामुळे केळी काळी पडत नाही. त्यानंतर पुन्हा ४ ते ५ मिनिटे मंद आचेवर गॅसवर भाजून घ्या.
6. दूध आणि पाण्याला उकळी आल्यानंतर रवा चांगला भाजल्यानंतर त्यात दूधाचे मिश्रण थोडे थोडे घाला. मंद आचेवर गॅस ठेवा ज्यामुळे दूध बाहेर येणार नाही.
7. आता मिश्रण चांगले मिसळून घ्या. ज्यामुळे रव्याच्या गुठळ्या तयार होणार नाही. रवा शिजल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून ३ ते ४ मिनिटे झाकण झाकूण वाफ काढा.
8. मिश्रणाला तूप सुटल्यानंतर रवा चांगला शिजला असे समजावे. पुन्हा एकदा ढवळून घ्या. आता वरुन साखर घाला. साखर विरघळल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवा.
7. पुन्हा झाकण झाकूण ३ ते ४ मिनिटे वाफ काढा. रव्याला पुन्हा तुपाचा थर येईल. पुन्हा एकदा मिश्रण वर खाली करुन घ्या. वरुन काजू-बदाम घाला आणि मिक्स करुन घ्या. वेलची पावडर घालून पुन्हा ढवळून घ्या.
8. वरुन तुळशीची पाने घालून मिश्रण वर खाली करा. मस्त असा दाणेदार प्रसादाचा शिरा तयार